Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साडे बारा हजार फूट उंचीवर ‘मना’चे श्लोक’चं झालं शूटिंग, चित्रपट कधी होणार प्रदर्शित?

मराठी चित्रपट 'मना’चे श्लोक’ येत्या १० ऑक्टोबरला चिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटाच्या नावावरूनही सध्या वाद सुरु आहे. अश्यातच या चित्रपटाच्या शूटिंगबाबत काही माहिती आपण जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 09, 2025 | 01:41 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • साडे बारा हजार फूट उंचीवर चित्रपटाचे चित्रीकरण
  • चित्रपटाला मिळतोय विरोध?
  • चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘‘मना’चे श्लोक’ या चित्रपटाचा टिझर, ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत. या सगळ्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. हिमाचलच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीत चित्रित झालेली दृश्यं, आणि ट्रेकिंगचे साहसी क्षण यामुळे ‘‘मना’चे श्लोक’चे वेगळेपण प्रकर्षाने जाणवते. चित्रपटातील काही खास दृश्यं हिमाचल प्रदेशातील सुमारे साडेबारा हजार फूट उंचीवर चित्रीत करण्यात आली आहेत. हिमाचलच्या हिरव्या पर्वतरांगांमध्ये या चित्रपटाचं शूटिंग करणं हे जितकं निसर्गरम्य दिसते, तितकेच ते आव्हानात्मकही होतं.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपूटकर आणि करण परब ट्रेकिंग करताना दिसत आहेत. ही दृश्य चित्रीत करताना संपूर्ण टीमने प्रत्यक्ष ट्रेक करत सगळी उपकरणं आणि आवश्यक साहित्य स्वतःच्या खांद्यावर वाहून नेलं. इतक्या उंचीवर कोणतीही वॅनिटी व्हॅन, मेकअप रूम किंवा इतर सोयी उपलब्ध नव्हत्या.

‘अशोक मा.मा.’ मालिकेत नवे वळण, भैरवीच्या स्वप्नांना मिळणार का अशोक मामांची साथ?

या अनुभवाविषयी दिग्दर्शिका आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे म्हणाली, ‘’हा प्रवास आमच्यासाठी खूपच अनोखा होता. इतक्या उंचीवर संपूर्ण टीमला घेऊन जाऊन चित्रीकरण करणं, हे खूपच मोठं आव्हान होतं. वॅनिटी वॅन, मेकअपसारख्या कोणत्याच गोष्टींचा आधार न घेता, सर्वांनी मिळून हा ट्रेक केला. सर्व कलाकारांनी आणि टीमने अपार मेहनत घेतली आहे. हा प्रवास प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवेल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.”

चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपूटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब ही तरुण कलाकारांची मुख्य भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यांच्यासोबतच लीना भागवत, मंगेश कदम, शुभांगी गोखले आणि उदय टिकेकर हे अनुभवी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

Taylor Swift ने मोडला Adele’s चा मोठा रेकॉर्ड, ‘द लाईफ ऑफ ए शो गर्ल’ ने रचला इतिहास

चित्रपटाला मिळतोय विरोध?
सज्जन गड येथील श्री समर्थ सेवा मंडळाने ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाच्या शीर्षकाचा विरोध केला आहे. ‘मनाचे श्लोक’ या पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर सिनेमासाठी केल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर, मनोरंजनासाठी, काल्पनिक गोष्टींसाठी नको, अशी मागणी त्यांनी केली आहे. चित्रपटाचं नाव बदललं नाही तर आंदोलनाचा इशाराही श्री समर्थ सेवा मंडळाने दिला आहे. परंतु, अद्याप या प्रकरणी सिनेमाची टीम किंवा मृण्मयी देशपांडे हिच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाहीये.

‘‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट येत्या १० ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केलं असून, निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा आहेत. स्टारलाईट बॉक्स थिएटर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्याद्वारे हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.

Web Title: Manache shlok shot at an altitude of 12500 feet film to release on october 10

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 01:40 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Marathi News

संबंधित बातम्या

Palghar Election : निवडणूक जिंकून मनातला देशसेवेचा विचार पूर्ण करेन- करण तिवारी
1

Palghar Election : निवडणूक जिंकून मनातला देशसेवेचा विचार पूर्ण करेन- करण तिवारी

”सासर नवऱ्याचं, माहेर भावाचं..”, सासुरवाशीण–माहेरवाशीणच्या चक्रात अडकलेल्या मुलींच्या वेदनेवर प्राजक्ता हनमघरचे थेट भाष्य
2

”सासर नवऱ्याचं, माहेर भावाचं..”, सासुरवाशीण–माहेरवाशीणच्या चक्रात अडकलेल्या मुलींच्या वेदनेवर प्राजक्ता हनमघरचे थेट भाष्य

कोकणातील ‘या’ गावात 1492 सालापासून ‘ही’ अनोखी परंपरा सुरु! पाठीवर तीक्ष्ण लोखंडी आकडे टोचून…
3

कोकणातील ‘या’ गावात 1492 सालापासून ‘ही’ अनोखी परंपरा सुरु! पाठीवर तीक्ष्ण लोखंडी आकडे टोचून…

Ratnagiri News : चिपळूण सायकलिंग क्लबच्या रायडर्सचा दबदबा; देशभरातून १५० सायकलस्वारांची झाली निवड
4

Ratnagiri News : चिपळूण सायकलिंग क्लबच्या रायडर्सचा दबदबा; देशभरातून १५० सायकलस्वारांची झाली निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.