(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
नुकताच ‘जिलबी’ सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. आणि या ट्रेलर लाँच वेळी अभिनेता प्रसाद ओकने स्वप्नील जोशीचे तोंड भरून कौतुक करताना दिसला. तसेच दोघांही एकमेकांबद्दल काही खास गोष्टी देखील चाहत्यांसह शेअर केल्या आहेत. ‘जिलबी’च्या निमित्ताने स्वप्नील आणि प्रसाद पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. हा दोघांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. तसेच हा चित्रपट आता लवकरच सिनेमागृहात दाखल होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर चाहत्यांमध्ये आता हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.
Toxic Teaser: यशच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळाले खास सरप्राईज, रिलीज झाला ‘टॉक्सिक’चा म्युझिकल टीझर!
दिग्दर्शक अभिनेता प्रसाद ओक स्वप्नील जोशीच कौतुक करताना म्हणाला की, ‘आम्हा दोघांना जिलबीच्या निमित्ताने स्क्रीन स्पेस शेअर करता आली. आम्ही पहिल्यांदा एकत्र काम करतो आहे आणि जिलबीच्या सोबतीने आमच्या अनेक कामाची एकत्र सुरुवात झाली आहे. जिलबी होत असताना आमचं ठरलं की आपण ‘सुशीला सुजीत’ हा चित्रपट देखील करतोय म्हणून आमच्यासाठी ‘जिलबी’ हा चित्रपट अगदीच खास आहे. स्वप्नील कमालीचा अभिनेता आहे आणि त्याचा सोबत काम करताना देखील तितकीच मज्जा आली. मी सेटवर स्वप्नीलला कायम निरखून बघायचो त्याची काम करण्याची पद्धत काम करण्याचा उत्साह हा सेटवर एक खेळीमेळीच वातावरण निर्माण करणार असायचं. स्वप्नील एक अभिनेता म्हणून उत्तम आहे पण निर्मिती विश्वात तो काहीतरी वेगळं करू पाहतोय आणि येणाऱ्या काळात देखील स्वप्नील उत्तम प्रोजेक्ट्स करेन अशी मला खात्री आहे’. असे अभिनेत्याने सांगून स्वप्नील जोशीचे भभरून कौतुक केले आहेत.
OTT Release: ‘द साबरमती रिपोर्ट’ या दिवशी ओटीटीवर धडकणार, जाणून घ्या कुठे पाहता येणार चित्रपट!
सहकलाकारा कडून मिळणार कौतुक हे प्रत्येक अभिनेत्यासाठी खास असतं यात शंका नाही. जिलबी मध्ये स्वप्नील एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. पण आता ही जिलबी नक्की गोड की गूढ हे चित्रपटगृहात चित्रपट पाहतानाच प्रेक्षकांना समजणार आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ही खुमासदार ‘जिलबी’ १७ जानेवारीला आपल्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले आहे. ‘जिलबी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. आनंद पंडित आणि रूपा पंडित हे चित्रपटाचे निर्माते आहेत. क्रिएटिव्ह दिग्दर्शन आणि सहनिर्मितीची जबाबदारी राहुल व्ही. दुबे यांनी सांभाळली आहे. छायांकन गणेश उतेकर तर कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत.