Rinku Rajguru: एका रात्रीत रिंकू राजगुरूने मिळवली प्रसिद्धी, जाणून घ्या 'आर्ची' चा अनोखा प्रवास!

'सैराट' चित्रपटात आर्चीच्या भूमिकेतून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी 'आर्ची' एका रात्रीत स्टार बनली. अभिनेत्रीने 'सैराट' चित्रपट सुपरहिट दिल्यानंतर तिचा चाहता वर्ग वाढला आणि चाहत्यांची क्रश बनली.
(फोटो सौजन्य - Instagram)
(फोटो सौजन्य - Instagram)
Published on: 
Updated on: 

लाखो चाहत्यांच्या हृदयात घर करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरु प्रसिद्धीच्या झोतात आहे. 'सैराट' चित्रपटात आर्चीच्या भूमिकेतून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी 'आर्ची' एका रात्रीत स्टार बनली. जबरदस्त संवाद, डॅशिंग स्वॅग आणि दमदार अभिनयाने पहिल्याच सिनेमातून रिंकू राजगुरने खूप प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर तिनं अनेक सिनेमात वेब-सिरीजमध्ये काम करत आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली. अभिनेत्रीने यानंतर अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे. आता ती लवकरच नवनवीन प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

रिंकूचे बालपण एकदम सामान्य गेले. वडील शिक्षक असल्यामुळे त्यांच्या घरात नेहमीच शिक्षणाला प्राधान्य मिळाले आहे. रिंकूची अभिनयाची विशेष तयारी नव्हती, पण नागराज मंजुळेच्या सैराटमुळे रिंकूचं नशीबच बदलले आणि तिला प्रसिद्दीच्या झोतात आणले. 2016 मध्ये ‘सैराट’ चित्रपटातून तिने पदार्पण केलं, आणि अवघ्या महाराष्ट्राने तिला ‘आर्ची’ म्हणण्यास सुरुवात केली.

3 जून 2001 रोजी सोलापूरजवळील अकलूज गावात जन्मलेली रिंकू आता मराठीसह हिंदीत देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस तिचा चाहतावर्ग वाढत चालला आहे. ३ जूनला रिंकूने स्वतःचा वाढदिवस साजरा केला अभिनेत्री आता २४ वर्षांची झाली आहे. कमी वयात आज ती प्रसिद्द अभिनेत्री आहे. स्टारडम असूनही रिंकूने शिक्षण बाजूला ठेवले नाही. तीने अभिनयासोबत आपल्या शिक्षणालाही तितकंच महत्त्व दिले आहे आणि ती सध्या पदवीचे शिक्षण घेत आहे.

रिंकू राजगुरुने सैराटनंतर कागर, मेकअप, झुंड, कॉलेज रोमान्स सीझन 3 यामध्ये आपल्या अभिनयाची दमदार छाप सोडली. ओटीटीवरही अभिनेत्रीने स्वतःचे वर्चस्व गाजवले. दरम्यान, रिंकू राजगुरु सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. फोटो, व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांशी संवाद साधताना दिसत असते. तिच्या लाइफ अपडेट शेअर करत असते. चाहते तिच्या फोटोला भरभरून प्रतिसाद देताना दिसत असतात.