
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सचिन पिळगावकर हे मराठी आणि हिंदी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते असून त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सचिन पिळगावकर सोशल मीडियावरही कायम सक्रिय असतात. ते नव- नवीन ट्रेंडवर व्हिडिओ शेअर करतात. सचिन पिळगावकर आणि त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर यांनी धुरंधर सिनेमाचा ट्रेंड फोलो केला आहे. सध्या रणवीर सिंग, अक्षय खन्ना यांच्या धुरंधर सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमाच्या गाण्यांचा सोशल मीडियावर ट्रेंड सुरू झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील प्रसिद्ध Fa9la हे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गाण्याचे डान्स मूव्ह्स चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. प्रत्येक जण त्यावर गाण्यावर रील्स बनवत आहेत. अशातच आता सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर या दोघांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त धुरंधर गाण्याचा ट्रेंड फॉलो केला आहे.
धुरंधर सिनेमातील ‘Fa9la’ या व्हायरल गाण्यावर डान्स केलाय. सचिन आणि सुप्रिया यांच्यासोबत व्हिडिओमध्ये त्यांची मुलगी श्रियासुद्धा डान्स मूव्ह्स करताना दिसतेय. ४०व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सचिन आणि सुप्रिया यांनी हटके डान्स केला.
श्रियाने सचिन आणि सुप्रिया यांचा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये त्यांच्या नात्याचं कौतुक केलं आहे. तिने लिहिलं, “ह्यांची केमिस्ट्री! ४० वर्षांचं प्रेम, हास्य, गोष्टी, प्रगती, एकमेकांची साथ आणि तो वेडेपणा कधीही कमी होऊ देऊ नका. पडद्यावर आणि पडद्यामागे अशा सुंदर कथा घडवल्याबद्दल आणि दररोज एकमेकांना निवडल्याबद्दल मनापासून शुभेच्छा. तुम्ही प्रत्येक बाबतीत आदर्श आहात. Love you my cuties… Happy Anniversary!”
या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स देखील केल्या आहेत.तर काहींनी त्यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
हे लोकप्रिय जोडपे विविध चित्रपटांमधून आणि भूमिकांमधून नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘आम्ही सातपुते’, ‘आयत्या घरात घरोबा’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांत सचिन आणि सुप्रिया यांनी एकत्र काम केलं असून, त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून प्रेम दिलं आहे.