(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
शुभम प्रोडक्शन फिल्म्स प्रस्तुत ‘पौर्णिमेचा फेरा’ ही हॉरर कॉमेडी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून शुभम प्रोडक्शन फिल्म्सच्या युट्युब चॅनेलवर ही वेबसिरीज झळकली आहे. शुभम प्रोडक्शन फिल्म्स प्रस्तुत ‘पौर्णिमेचा फेरा’ या वेबसिरीजची निर्मिती पायल गणेश कदम यांनी केली असून अजय सरतपे दिग्दर्शित या सीरिजमध्ये निखिल बने, मंदार मांडवकर, सिद्धेश नागवेकर, संजय वैद्य, प्राची केळुस्कर, संदीप रेडकर, दीपा माळकर, चंदनराज जामदाडे, स्नेहल आयरे, दर्शना पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शुभम विलास कदम यांची कथा असलेल्या या सीरिजचे संवाद, लेखन संदेश लोकेगावकर यांनी केले आहे.
या सीरिजमध्ये तीन मित्र त्यांच्या मित्राच्या कोकणातील वडिलोपार्जित घरी भेट देतात. कोकणातला त्यांचा हा प्रवास, यादरम्यान घडलेली घटना, त्यात दडलेली रहस्ये यात पाहायला मिळणार आहेत. ही रहस्ये काय असतील? हे सगळं या सिरीजमध्ये दिसणार आहे. पौर्णिमेच्या चंद्राचा आणि या घटनांचा काय संबंध असेल, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले असतील तर या सगळ्याची उत्तरे ही वेबसिरीज पाहून मिळतील. या वेबसीरिजचे चित्रीकरण मुंबईमधील काही भागांत आणि कोकणातील गुहागर येथे झाले आहे.
हे देखील वाचा – ‘बिग बॉस 18’च्या घरात ॲलिस कौशिक झाली भावुक, वडिलांच्या निधनाचे धक्कादायक सत्य केले उघड!
याचित्रपटाबद्दल पायल कदम म्हणाल्या , “या वेबसीरिजचा जॉनर हॉरर कॉमेडी असून हा जॉनर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ‘पौर्णिमेचा फेरा’ चे वैशिष्ट्य म्हणजे या कथेत रहस्य, रोमांच, भीती असतानाच त्याला कॉमेडीचा टच देण्यात आला आहे. खात्री आहे ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.” असे त्या म्हणाल्या आहेत. ही वेब सिरीज चाहत्यांना शुभम प्रोडक्शन फिल्म्सच्या युट्युब चॅनेलवर पाहता येणार आहे. निखिल बने, मंदार मांडवकर यहे दोघेही हास्य जत्रे नंतर वेबसिरीजमध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत.