
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या कुटुंबात नुकताच लग्नसोहळा पार पडला. त्यांच्या मुलाचा म्हणजेच सोहम बांदेकरच्या लग्नसोहळ्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होतं. सोहमचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले, मात्र आता बांदेकर कुटुंबीयांवर दु: खद प्रसंग ओढवला आहे. बांदेकरांच्या घरातील लाडका श्वानाचं म्हणजेच लाडक्या सिंबाचं निधन झालं आहे. सिंबाचे बांदेकरांच्या घरात एक महत्त्वाचे स्थान होते. सिंबा हा सोहम बांदेकरसाठी केवळ पाळीव श्वान नव्हता, तर त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग होता. सोहमच्या पत्नीने म्हणजेच पूजा बिरारीने त्यांच्या लग्नात हातावरूल मेहंदीत सिबंचं चित्र काढून घेतलं होतं. यामुळे समजतं. बांदेकर कुटुंबीयांचं सिंबावर असलेलं प्रेम दिसून येतं.
सिंबाच्या निधनामुळे सोहम बांदेकर भावूत झाला आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सोहमने सिंबाचे फोटो शेअर केले आहेत . कॅप्शनमध्ये सोहम लिहितो, “मी आज २८ वर्षांचा आहे पण, यापैकी जवळपास १७ वर्षे तू माझा जोडीदार होतास, माझा रूममेट झालास, मला कायम आधार दिलास, नेहमी माझ्या मदतीला धावून येणं, तू माझ्यावर जीवापाड प्रेम केलंस….पण, आत त्याने माझी साथ सोडली आहे. त्याने नेहमी माझ्यावर निस्वार्थ प्रेम केलं. तू जरी मला सोडून गेलास तरी कायम माझ्या मनात राहशील सिंबा!”
“तुम्ही सर्वांनी सिंबावर खूप प्रेम केलं. सिंबाची मनापासून काळजी केली. खरंतर त्याला तुम्ही कधीही भेटला नव्हता तरीही नेहमी त्याच्याबद्दल विचारपूस केली. तुम्हा सर्वांची ही आपुलकी नेहमीच त्याला जाणवत होती. त्यासाठी सर्वांचे आभार मानतो- आदेश सुचित्रा पूजा सोहम” अशी पोस्ट शेअर करत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.सोहमच्या पोस्टवर सगळ्यांनी कमेंट्स करत दु:ख व्यक्त केलं आहे. सिंबा केवळ सोहमच्या नव्हे तर त्याच्या कुटुंबीयांच्या आणि मित्रमंडळींच्या देखील जवळचा होता.