Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर कुत्र्याचा जीवघेणा हल्ला, एक-दोन नव्हे तर तब्बल…; घटनेचा धक्कादायक Video व्हायरल

मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एका महिलेवर शेजाऱ्याच्या 'केन कार्सो' (Cane Corso) या अत्यंत आक्रमक आणि शक्तिशाली ब्रीडच्या कुत्र्याने भीषण हल्ला केला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 30, 2026 | 08:06 PM
मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर कुत्र्याचा जीवघेणा हल्ला, एक-दोन नव्हे तर तब्बल...; (Photo Credit- X)

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर कुत्र्याचा जीवघेणा हल्ला, एक-दोन नव्हे तर तब्बल...; (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर कुत्र्याचा जीवघेणा हल्ला
  • एक-दोन नव्हे तर तब्बल…;
  • घटनेचा धक्कादायक Video व्हायरल
बंगळुरूच्या एचएसआर लेआउट (HSR Layout) परिसरात सकाळी एक थरारक घटना घडली. मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एका महिलेवर शेजाऱ्याच्या ‘केन कार्सो’ (Cane Corso) या अत्यंत आक्रमक आणि शक्तिशाली ब्रीडच्या कुत्र्याने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात महिलेच्या चेहरा आणि मानेवर ५० पेक्षा जास्त टाके पडले असून, त्या सध्या रुग्णालयात आहेत.

नेमकी घटना काय?

२६ जानेवारी रोजी सकाळी ६:५४ च्या सुमारास टीचर्स कॉलनीमध्ये सत्यप्रकाश दुबे यांच्या पत्नी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या. याच वेळी शेजारी राहणाऱ्या अमरेश रेड्डी यांचा पाळीव कुत्रा घरासमोर मोकळा होता. काही समजण्यापूर्वीच या कुत्र्याने महिलेच्या मानेवर झडप घातली. कुत्र्याने त्यांच्या चेहऱ्याला आणि हाता-पायांना गंभीर दुखापत केली. मालकाने कुत्र्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला.

Pet #DogAttacks Woman During Morning Walk in #Bengaluru A woman was seriously injured after being attacked by a pet dog while she was on a morning walk in the #TeachersColony of #HSRLayout in Bengaluru. The incident occurred when the dog, reportedly from a nearby house in the… pic.twitter.com/XpSRIajUC4 — BNN Channel (@Bavazir_network) January 30, 2026

ती हसली… पण माणूस म्हणून हारली! शाळेतील मित्राला पिझ्झा डिलिव्हर करताना पाहून तरुणीने उडवली खिल्ली, युजर्स संतापले; Video Viral

५० टाके आणि खोल जखमा

पीडित महिलेला तातडीने सेंट जॉन रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुत्र्याचा हल्ला इतका भयानक होता की, डॉक्टरांना त्यांच्या जखमा शिवण्यासाठी ५० पेक्षा जास्त टाके घालावे लागले. सध्या त्या गंभीर मानसिक धक्क्याखाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मालकाच्या हलगर्जीपणामुळे गुन्हा दाखल

महिलेचे पती सत्यप्रकाश दुबे यांनी एचएसआर लेआउट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. “कुत्रा इतका धोकादायक होता की मालकालाही त्याला आवरता आले नाही. कुत्र्याला ना साखळदंडाने बांधले होते, ना त्याच्या तोंडावर मास्क होता. अशा निष्काळजी मालकाला कठोर शिक्षा व्हायला हवी,” अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी मालकाविरोधात हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

का धोकादायक आहे ‘केन कार्सो’ ब्रीड?

‘केन कार्सो’ ही मूळची इटलीची प्रजाती असून तिला ‘इटालियन मस्टिफ’ म्हणूनही ओळखले जाते. रोमन काळात या कुत्र्यांचा वापर युद्धात, शिकार करण्यासाठी आणि मालमत्तेच्या रक्षणासाठी केला जात असे. यांचे वजन ४५ ते ५० किलोपेक्षा जास्त असू शकते आणि उंची ७० सेंटीमीटरपर्यंत असते. हे अत्यंत मस्कुलर आणि ताकदवान असतात. हे कुत्रे अत्यंत जिद्दी आणि आक्रमक असू शकतात. या कुत्र्यांना योग्य सामाजिकीकरण आणि कठोर प्रशिक्षणाची गरज असते, अन्यथा ते मानवी वस्तीसाठी धोकादायक ठरू शकतात.

भीती नाही, कारण बाबा आहे! वडिलांवर विश्वास ठेवून 2 वर्षांच्या चिमुकल्याने छतावरून मारली उडी, मग पुढे जे घडलं… Video Viral

Web Title: Woman injured in dog attack during morning walk 50 stitches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 08:06 PM

Topics:  

  • Attack
  • Bengaluru
  • Dog
  • viral video

संबंधित बातम्या

वधू-वर आणि KISS! दुरूनच भटजी आले धावून… नवरा-बायकोला वेगळं करत टाकला कटाक्ष, पाहून युजर्सना हसू आवरेना; Video Viral
1

वधू-वर आणि KISS! दुरूनच भटजी आले धावून… नवरा-बायकोला वेगळं करत टाकला कटाक्ष, पाहून युजर्सना हसू आवरेना; Video Viral

ती हसली… पण माणूस म्हणून हारली! शाळेतील मित्राला पिझ्झा डिलिव्हर करताना पाहून तरुणीने उडवली खिल्ली, युजर्स संतापले; Video Viral
2

ती हसली… पण माणूस म्हणून हारली! शाळेतील मित्राला पिझ्झा डिलिव्हर करताना पाहून तरुणीने उडवली खिल्ली, युजर्स संतापले; Video Viral

भीती नाही, कारण बाबा आहे! वडिलांवर विश्वास ठेवून 2 वर्षांच्या चिमुकल्याने छतावरून मारली उडी, मग पुढे जे घडलं… Video Viral
3

भीती नाही, कारण बाबा आहे! वडिलांवर विश्वास ठेवून 2 वर्षांच्या चिमुकल्याने छतावरून मारली उडी, मग पुढे जे घडलं… Video Viral

सौंदर्यावरून उडेल तरुणांचा विश्वास! Viral Video पाहून तुम्ही ही म्हणाल “नक्की काय चालूये हे…?”
4

सौंदर्यावरून उडेल तरुणांचा विश्वास! Viral Video पाहून तुम्ही ही म्हणाल “नक्की काय चालूये हे…?”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.