
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
‘पिंगा ग पोरी पिंगा’ मालिकेत तेजा–हर्षितचं बहुप्रतिक्षित लग्न प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. पिंगा गर्ल्स मिळून हे लग्न लावून देताना सगळ्या विधींचा आनंद या विवाह सोहळ्यात रंगणार आहे. साखरपुडा, संगीत, मेहेंदी, हळद अशा सर्व समारंभांची रंगतदार माळ आणि शेवटी विवाहसोहळा. विशेष भाग प्रेक्षकांना १६ नोव्हेंबर संध्या. ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर पाहायला मिळेल. मुलं मुलीच्या पत्रिका तपासण्याच्या हट्टावरून हर्षितच्या आईमुळे तेजा हर्षितमध्ये तणाव निर्माण होतो आणि अखेरीस तेजा हे लग्न मोडण्याचा निर्णय जाहीर करते.
सगळे तिच्यावरच आरोप करतात आणि त्यामुळे चित्रासोबत तिचे मतभेद वाढतात, पण वल्लरी मात्र तिच्या बाजूने उभी राहते आणि पहिल्यांदाच हर्षित आपल्या आईच्या वागण्याचा विरोध करत तेजाच्या बाजूने उभा राहतो आणि मनोज–वल्लरीच्या पाठिंब्यामुळे तेजा पुन्हा लग्नाला तयार होते. या सगळ्या अडचणींवर मात करत आता तेजा – हर्षित चे लग्न मोठ्या धुमधडाक्यात होणार आहे. लग्नाच्या दिवशी मैत्रीतल्या एकजुटीचा सुंदर क्षण प्रेक्षकांना भावूक करणार आहे हे नक्की आता नक्की काय घडेल ते कळेलच.
स्वतःचे आकाश शोधायला निघालेल्या ‘कैरी’ची गोष्ट, पॉवरपॅक्ड मराठी कलाकारांच्या लक्षवेधी भूमिका
या सर्व घटनांच्या धामधुमीत लग्नातील ‘कन्यादान’ प्रसंग मात्र मालिकेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. येथे मालिकेतून समाजात पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या काही रूढी परंपरांकडे नवा दृष्टिकोन देत, कन्यादानातील मुलीच्या वडिलांनी जावयाच्या पाया पडण्याची प्रथा योग्य आहे का यावर संवेदनशीलपणे प्रकाश टाकला जाणार आहे. एका कुटुंबाचा सन्मान दुसऱ्या कुटुंबापेक्षा कमी असू नये, लग्नानंतर फक्त मुलीचं आयुष्य बदलतं ही मानसिकता कालबाह्य झाली आहे, दोन्ही घरांचे आईवडील समान सन्मानास पात्र आहेत, स्त्रीवर अन्याय किंवा दबाव आणणाऱ्या चालीरीती स्वीकारण्याची वेळ आता संपली आहे आणि परंपरा या फक्त मानवी सन्मान वाढवणाऱ्या असाव्यात असा संदेश या प्रसंगातून दिला जाणार आहे.
Indian Idol: शिबानी दांडेकरने केली डोंबिवलीच्या अंशिकाची स्तुती म्हणाली, ”तूच बँड लीडर..”
तेजा–हर्षितच्या लग्नातील हा प्रसंग आजच्या समाजात स्त्री–पुरुष समानतेबद्दल, कुटुंबातील परस्पर आदराबद्दल आणि परंपरांचा सन्मान ठेवत नव्या विचारांना स्थान देण्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात विचार निर्माण करणारा ठरेल.