(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
मराठी चित्रपट जोगवा आणि हिंदी चित्रपट ॲनिमल मधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता उपेंद्र लिमये आता लवकरच ‘स ला ते स ला ना ते’ या अनोखं नाव असलेल्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. उपेंद्र लिमये यांनी नेहमीच भूमिकांमधील वैविध्य जपत उत्तम अभिनयाचं दर्शन घडवलं असून, ‘स ला ते स ला ना ते’मध्ये अभिनेता हसनभाईची भूमिका साकरणार असून अभिनेत्याची भूमिका यावेळी लक्षवेधी असणार आहे. या चित्रपटाची कथा आणि स्टारकास्ट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. कसलेले कलाकार, उत्तम कथानक असलेला ‘स ला ते स ला ना ते’ या ‘नात्यांच्या व्याकरणाची गोष्ट’ अशी टॅगलाइन असलेला हा चित्रपट येत्या ७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
चित्रपटाची कथा
न्यूज चॅनेलचा पत्रकार आणि पर्यावरणप्रेमी तरुणी यांच्या नात्याची गोष्ट या चित्रपटातून उलगडणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर हिरव्यागार वनराईतून जाणारा रस्ता दिसतो आहे. त्यामुळे प्रेमकथेसह पर्यावरणाशी संबंधित ही गोष्ट असल्याचा अंदाज बांधता येतो. पण ‘स ला ते स ला ना ते’ असं या चित्रपटाचं नाव का आहे, या प्रश्नाचं उत्तर ७ फेब्रुवारीला चित्रपटगृहातच मिळणार आहे. या चित्रपटाची ही अनोखी कथा आणि कलाकार पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट दमदार स्टारकास्टसह लवकरच सिनेमागृहात दाखल होणार आहे.
Bigg Boss 18 : करणवीर मेहराच्या नावावर मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा दुसरा अभिनेता
चित्रपटातील तगडे कलाकार
स्टुडिओ लॉजिकल थिंकर्स प्रस्तुत ‘स ला ते स ला ना ते’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केले आहे. श्रीकांत बोजेवार, तेजेश घाडगे, संतोष कोल्हे यांनी पटकथा लेखन तर श्रीकांत बोजेवार यांनी संवाद लेखन केले आहे. विनायक जाधव यांनी छायांकन तर सचिन नाटेकर यांनी संकलन, आणि एकनाथ कदम यांनी कला दिग्दर्शन केले आहे. रोहित नागभिडे यांनी चित्रपटाचे पार्श्वसंगीत पहिले आहे. रोहित प्रधान यांना चित्रपटाची ध्वनिआरेखन केलं आहे.
दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी नेहमीच वेगळ्या कलाकृती केल्या आहेत. त्यांच्या मराठी-हिंदी टीव्ही मालिका खूप प्रसिद्ध झाल्या आहेत. आणि प्रेक्षकांनी यांना भरभरून प्रतिसाद देखील दिला आहे. तसेच चित्रपटांतून मनोरंजक पद्धतीनं सामाजिक भाष्य करण्याची त्यांची शैली आहे. ‘स ला ते स ला ना ते’ हा चित्रपट विविध महोत्सवांमध्येही दाखवला गेला आहे. अभिनेता उपेंद्र लिमये, छाया कदम यांच्यासह रिचा अग्निहोत्री, साईंकित कामत, पद्मनाभ बिंड, मंगल केंकरे, वंदना वाकनीस, सुदेश म्हशीलकर, रमेश चांदणे, सिद्धीरूपा करमरकर यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
Yogesh Mahajan Death: अभिनेता योगेश महाजनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, कुटुंबीयांनी दिली माहिती
वृत्तवाहिनीचा रिपोर्टर आणि पर्यावरणप्रेमी तरुणी यांची प्रेमकथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या दोघांच्या उमलणाऱ्या नात्यात अनेक व्यक्तिरेखा येतात. उपेंद्र लिमये यांची भूमिकाही त्यापैकीच एक आहे. एका खाणमालकाची भूमिका उपेंद्र लिमये करत आहेत. त्यामुळे अतिशय वेगळ्या अशा या कथानकावरील ‘स ला ते स ला ना ते’ हा चित्रपट विविध महोत्सवांमध्येही दाखवला गेला आहे. आता हा चित्रपट येत्या ७ फेब्रुवरीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.