Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त ‘गौरव माय मराठीचा’ गीताची भेट; गुरु एस. नायर यांची खास निर्मिती

अभिजात मराठीचा जल्लोष लवकरच ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त लोकांना पाहायला मिळणार आहे. येत्या २७ फेब्रुवारी ‘गौरव माय मराठीचा’ हे गाणं प्रदर्शित होणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 26, 2026 | 03:41 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • मराठी भाषेचा सांगीतिक जागर
  • बालकलाकार आदित्यची भरारी
  • दिग्गज तंत्रज्ञांची साथ
मराठी भाषेला नुकताच ‘अभिजात भाषा’चा मान मिळाल्यानंतर राज्यभर आनंदाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधत आणि २७ फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त, गुरु एस. नायर यांच्या निर्मितीतून ‘गौरव माय मराठीचा’ हे विशेष गीत रसिकांच्या भेटीला येत आहे. या गीताचे दिग्दर्शनही स्वतः गुरु एस. नायर यांनी केले आहे.

‘चला हवा येऊ द्यानंतर’ निलेश साबळेचा मोठा धमाका; ‘चला… काहीतरी नवीन करूया’ ची चाहत्यांना उत्सुकता

मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा आणि सांस्कृतिक वैभवाचा जागर घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या गीतातून करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून कला क्षेत्रात सक्रिय असलेल्या गुरु नायर यांनी मराठीवरील प्रेमातून या गीताची निर्मिती केली आहे. गीतातून मराठी साहित्य, इतिहास आणि संस्कृतीचे प्रभावी दर्शन घडते.

हे गीत बालगायक कुमार आदित्य जी. नायर आणि कोरस यांनी सादर केले आहे. अल्पवयातच आपल्या सुरेल आवाजाने ओळख निर्माण करणाऱ्या आदित्यने यापूर्वी कविता पौडवाल, उत्तरा केळकर, वैशाली सामंत, नागेश मोरवेकर आणि अभिजीत सावंत यांसारख्या नामवंत गायकांसोबतही काम केले आहे. ‘गौरव माय मराठीचा’मधून तो पुन्हा एकदा रसिकांना मंत्रमुग्ध करण्यास सज्ज आहे.

Vijay Rashmika Wedding: VIROSH च्या हळदी समारंभाचे फोटो व्हायरल; रश्मिकाचे टोपण नाव देखील उघड

गीताचे शब्द आणि संगीत किशोर मोहिते यांनी दिले असून, संगीत संयोजन सुदेश गायकवाड यांचे आहे. अनुभवी तंत्रज्ञांच्या साथीत साकारलेले हे गीत मराठी भाषेच्या गौरवाचा उत्सव साजरा करणारे ठरणार आहे. मराठी भाषेचा सन्मान आणि तिची महती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, या भावनेतून तयार केलेले हे गीत आदित्य नायर यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध होणार आहे. मराठी संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या या उपक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Web Title: Celebrate marathi language pride day with the grand musical tribute gaurav mai marathicha new song by kumar aditya g nair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Marathi News

संबंधित बातम्या

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ
1

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ

Maharashtra Live breaking News in Marathi:  आशियाई खेळात तिरंदाजी संघाकडून देशाला सातवे सुवर्णपदक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: आशियाई खेळात तिरंदाजी संघाकडून देशाला सातवे सुवर्णपदक

 Yemen Crisis : हुथींनी इराणी हवाई संरक्षण शस्त्रांचे क्रूझ क्षेपणास्त्रांत रूपांतर केल्याचा आरोप
3

 Yemen Crisis : हुथींनी इराणी हवाई संरक्षण शस्त्रांचे क्रूझ क्षेपणास्त्रांत रूपांतर केल्याचा आरोप

Breaking News :ऐतिहासिक क्षण ;२३ वर्षानंतर अमेरिकेची इराक मधून पूर्ण माघार
4

Breaking News :ऐतिहासिक क्षण ;२३ वर्षानंतर अमेरिकेची इराक मधून पूर्ण माघार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.