फोटो सौजन्य - viralbhayani
जॉन सीना मुंबईत : देशातील सर्वात श्रीमंत विवाह सोहळा आज म्हणजेच १२ जुलै रोजी होणार आहे. अनंत आणि राधिका यांच्या लग्नासाठी जगभरातून पाहुणे उपस्थित झाले आहेत. या विवाह सोहळ्याला कलाकारांची मेजवानी असणार आहे. भारतामधील दिग्गज कलाकार, बॉलीवूड सेलिब्रेटी त्याचबरोबर जगामधील प्रसिद्ध गायक, खेळाडू या सर्वानी या लग्नसोहळ्याला हजेरी लावली आहे. आज अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्नबंधनात अडकणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हॉलिवूड स्टार आणि माजी कुस्तीपटू जॉन सीना भारतामध्ये मुंबईत विमानतळावर दाखल झाला होता. आता तो उशीर न करता अनंत राधिका यांच्या लग्नामध्ये झलक पाहायला मिळाली आहे. त्याचे बरेच व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
जॉन सीना या व्हिडिओमध्ये त्याच्या कारमध्ये बसताना दिसला आहे. यावेळी त्याच्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही पाहुणे येत आहेत. अंबानी कुटुंब आपल्या पाहुण्यांचे मोठ्या थाटामाटात स्वागत करत आहे. लग्नसमारंभात सेलिब्रिटींची जमवाजमव होणार आहे. दरम्यान, WWE रेसलर जॉन सीनाचा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जॉन मुंबईला पोहोचताना दिसत आहे. जॉन सीना राखाडी रंगाचा टी-शर्ट, शॉर्ट्स आणि कॅप घातलेला दिसत आहे. तो पापाराझीकडे पाहून हसताना दिसला आणि त्याने सर्व छायाचित्रकारांचे आभार मानले. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक झाले आहेत.
#WATCH | Professional wrestler and actor, John Cena arrives at Jio World Convention Centre for Anant Ambani and Radhika Merchant’s wedding, in Mumbai pic.twitter.com/Ok20HfaSe8
— ANI (@ANI) July 12, 2024
परदेशातील हे कलाकार अनंत राधिकाच्या लग्नाला उपस्थित
दिग्गज सेलिब्रिटींच्या यादीत जॉन सीनाशिवाय किम कार्दशियन आणि ख्लो कार्दशियन यांचीही नावे आहेत. लग्नाला किम कार्दशियन, ख्लो कार्दशियन आणि जॉन सीना यांच्यासह माइक टायसन आणि जीन-क्लॉड व्हॅन डॅमे यांसारखे इतर आंतरराष्ट्रीय स्टार उपस्थित राहणार आहेत.
त्याचबरोबर भारतामधील संपूर्ण बॉलीवूड कलाकार, खेळाडू, बिझनेसमॅन हजेरी लवकर आहेत. अनंत राधिका यांचा हा सोहळा बऱ्याच महिन्यांपासून सुरु आहे. यामध्ये अनेक कलाकार सामील झाले होते. त्याचबरोबर अनंत राधिका यांच्या या सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहेत.