प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीच्या वडीलांवर गोळीबार, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल
पंजाबामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्री तानिया कंबोज हिच्या वडिलांवर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केला आहे. शुक्रवारी (४ जुलै) दुपारी त्यांच्या दोन अज्ञातांनी गोळीबार केला. ही घटना पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील कोट इसे खान या परिसरात घडली. अभिनेत्रीचे वडील पेशाने डॉक्टर होते. तानियाचे वडील डॉ. अनिल जीत सिंग कंबोज हे आपल्या क्लिनिकमध्ये काम करत असताना दोन अज्ञात व्यक्ती मोटारसायकलवरून आले आणि त्यांच्यावर थेट गोळ्या झाडल्या.
आषाढी एकादशीला रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिॲलिटी शोचा अंतिम सोहळा
डॉ. कंबोज यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार करुन त्यांनी तिथून पळ काढला. गोळीबारानंतर डॉ. कंबोज यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस ठाण्यापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या चौकामध्ये हरबंस नर्सिंग होम आहे. या ठिकाणी घडलेल्या या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण आहे. ही संपूर्ण घटना नर्सिंग होममध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध सध्या सुरू आहे.
Tania Kamboj Insta Story
बिग बॉस फेम अभिनेत्री अमृता देशमुखचं नवं गाणं रिलीज, “माय गो विठ्ठल” भक्तीगीत तुम्ही ऐकलंत का ?
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर रुग्ण असल्याचे भासवून डॉ. कंबोज यांच्या क्लिनिकमध्ये आले आणि अचानक त्यांनी डॉक्टरांवर हल्ला केला. हल्ल्यानंतर दोघेही तेथून पळून गेले. तानियाने या घटनेनंतर तिच्या इन्स्टाग्राम अताऊंटवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली. तिने लिहिलं की, “माझे वडील सध्या गंभीर अवस्थेत आहेत. आम्ही भावनिकदृष्ट्या फार कठीण काळातून जात आहोत. कृपया कुठल्याही अफवा पसरवू नका आणि आम्हाला थोडा वेळ आणि शांतता द्या.” तानिया ही पंजाबमधील लोकप्रिय अभिनेत्री असून ‘किस्मत’, ‘सुफना’, ‘गुड्डीयाँ पटोले’ यांसारख्या चित्रपटांमधून तिने नाव कमावलं आहे. वडिलांवर झालेल्या हल्ल्यामुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली जात आहे. पोलीस या घटनेचा गंभीरतेने तपास करत आहेत.