Akash Ambani Shloka Mehta Pregnant Again: मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. या व्यावसायिक जोडप्याचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याचे राधिका मर्चंटशी लग्न झाले आहे, त्यांची मुलगी ईशा अंबानीला जुळी (Isha Ambani twins) मुले आहेत आणि आता मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आणि सून आकाश अंबानी आणि श्लोका मेहता पुन्हा एकदा आई-बाबा होणार आहे. एनएमएसीसीच्या लॉन्चिंगवेळी हे जोडपे मीडियासमोर पोज देताना दिसले,जिथे श्लोका मेहता सुंदर साडीत तिचा बेबी बंप फ्लॉन्ट (Shloka Mehata baby bump) करताना दिसली. आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर श्लोका मेहता प्रेग्नंट असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहे. मात्र, अद्याप अंबानी कुटुंबाकडून याबाबत कोणतीहीअधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पृथ्वी अंबानीनंतर (Prithvi Ambani)आता त्यांच्या कुटुंबात आणखी एक नवा पाहुणा येणार आहे.
NMACC लॉन्चवेळी बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. यावेळी संपूर्ण अंबानी कुटुंबही उपस्थित होते. सर्वांच्याच चेहऱ्यावर यावेळी आनंद दिसत होता. अर्थात त्याचं कारणही तसंच होतं.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मोठी सून श्लोका मेहता पुन्हा एकदा गरोदर आहे, ती लवकरच आई होणार आहे. आकाश अंबानीची पत्नी NMACC च्या लॉन्चिंगमध्ये तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसली.
श्लोका मेहता आणि तिचा पती आकाश अंबानी या कार्यक्रमात थोडा उशीरा पोहोचले, दोघेही ट्रेडिशनल लूकमध्ये खूप सुंदर दिसत होते . यावेळी त्यांनी पापाराझींना सुंदर पोजही दिली. इव्हेंटमध्ये, श्लोकाने शिमरी गोल्डन साडी आणि त्या जोडीला गुलाबी दुपट्टा परिधान केला होता. या शिमरी गोल्डन साडीमध्ये श्लोका खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत होती. साडीसोबतच तिने मांग टिका, कानातले आणि बिंदीने तिचा लूक पूर्ण केला होता.तर दुसरीकडे आकाशने बॉटल ग्रीन कुर्ता आणि एम्ब्रॉयडरी जॅकेट घातले होते, ज्यामध्ये तो देखणा दिसत होता.
आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचे 9 मार्च 2019 रोजी लग्न झाले होते. या जोडप्याच्या लग्नाला देशातील आणि जगातील सर्व सेलिब्रिटी पोहोचले होते. त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. तर 10 डिसेंबर 2020 रोजी आकाश आणि श्लोका यांनी त्यांचा मुलगा पृथ्वी अंबानीचे स्वागत केले. आता तब्बल तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा आकाश-श्लोका आपल्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. अंबानी कुटुंबात सध्या आनंदाचं वातावऱण आहे.