अलिशान बंगला, महागडी कार अन् बरंच काही... नागा चैतन्य आणि सोभिताला सासरच्या मंडळींकडून करोडोंच्या भेटवस्तू; वाचा यादी
दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य सध्या त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. येत्या डिसेंबर महिन्यात नागा चैतन्य अभिनेत्री सोभिता धुलिपालासोबत लग्नबंधनात अडकरणार आहे. नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवातही झाली आहे. त्या विधी दरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दोघांच्या हळदीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नागा चैतन्य आणि सोभिताच्या घरी लग्नाची जोरदार चर्चा होत असताना सोभिताच्या घरून नागा चैतन्यला मिळालेल्या भेटवस्तूची जोरदार चर्चा होत आहे. लग्नाची भेट म्हणून नागाचैतन्यला त्याच्या सासरच्या मंडळींनी महागडी भेटवस्तू दिली आहे. तर नागाचैतन्यचे वडील नागार्जुन यांनी देखील होणाऱ्या सूनेला खास भेटवस्तू दिली आहे.
आयरा खानने आमिर खान आणि रिना दत्ताच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया
एशियानेट न्यूजएबलने दिलेल्या वृत्तानुसार, नागाचैतन्यला त्याच्या सासरच्या मंडळींनी लग्नाच्या मुहूर्तावर भेटवस्तु म्हणून अलिशान घर, महागडी गाडी आणि आणखी काही वस्तु गिफ्ट म्हणून दिलेल्या आहेत. सोभिता धुलिपालाच्या कुटुंबियांनी नागाचैतन्यला लग्नाच्या आधी बाईक, ऑडी कार आणि हैद्राबाद सारख्या शहरात एक अलिशान बंगला शिवाय सोनं इतक्या गोष्टी भेटवस्तु म्हणून देण्यात आलेल्या आहेत. तर, वरबाप आणि अभिनेते नागार्जुन यांनी नागाचैतन्यला आणि सोभिताला एक अलिशान कार गिफ्ट केलेली आहे. नागार्जुन यांनी मुलगा नागाचैतन्य आणि होणारी सून सोभिता धुलिपाला यांना लेक्सस एलएम एमपीव्ही मॉडेलची कार भेट म्हणून दिली आहे. या आलिशान कार किंमत तब्बल 2.5 कोटी रुपये आहे.
‘पुष्पा 2’च्या भीतीने ‘कन्नप्पा’ची रिलीज डेट ढकलली पुढे, अखेर विष्णू मंचूने केला खुलासा!
मीडिया रिपोर्टनुसार, नुकताच नागार्जुनला खैरताबाद येथील प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (आरटीए) कार्यालयात स्पॉट करण्यात आलं, जेथे अभिनेता नवीन खरेदी केलेल्या लक्झरी कारची नोंदणी करण्यासाठी आला होता. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला ५ डिसेंबर रोजी तेलुगू रितीरिवाजानुसार लग्न करणार असल्याचा दावा केला जात आहे. सध्या त्यांच्या हळदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये शोभिता प्रचंड सुंदर दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शोभिता धुलिपाला – नागा चैतन्य यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.