आयरा खानने आमिर खान आणि रिना दत्ताच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया
१६ वर्षांच्या संसारानंतर आमिर खान आणि रीना दत्ता यांनी २००२ मध्ये एकमेकांपासून घटस्फोट घेतला. घटस्फोट घेतल्यानंतरही दोघांनी मिळून मुलांचा सांभाळ केला. अलीकडेच आमिर खान आणि रीना दत्ताची लेक आयरा खानने पालकांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. की, तिच्या पालकांच्या घटस्फोटाचा तिच्या मानसिक आरोग्यावर फारसा परिणाम झाला नाही, असं आयराने एका मुलाखतीत सांगितलं.
‘आई कुठे काय करते’ मालिकेचं नाव कसं सुचलं ? मालिकेत मिलिंद गवळीला कोणी कास्ट केलं ?
पिंकविलाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आयराने सांगितले की, “आई-बाबा केव्हाच आमच्यासमोर भांडले नाहीत. ते नेहमीच आमच्यासोबत एकत्र राहिले. इतकं सर्व घडत असतानाही त्यांचे कुटुंबाप्रती एकमेकांवर प्रेम होते. मला वाटले, ‘नाही, हा घटस्फोट माझ्यावर नकारात्मक परिणाम करणारा असू शकत नाही.’ जसजशी मी मोठी होत गेले, तसं मला जाणवलं की हे नातं योग्य पद्धतीने संपलं. कदाचित हे नातं चांगल्यासाठी संपलं असेल आणि कोणतंही नातं संपलं की त्रास होतोच. जे मी लहानपणी जाणूनबुजून स्वीकारण्यास नकार दिला होता, ते मला समजायला लागल्यापासून त्याचं उत्तर मिळालं. मी माझ्या डॉक्टरांसोबत चर्चा केली आहे आणि मला कळलं आहे की यात कोणीही दोष देत नाही काही गरज नाही, जे घडले ते स्वीकारणे महत्वाचे आहे. ”
अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ पाहण्यासाठी जाणून घ्या तिकीट कसे आणि कुठे मिळणार, नाहीतर होईल पश्चताप!
पालकांचे कौतुक करताना, आयरा पुढे म्हणाली, “माझ्या आई-वडिलांनी आम्हाला सुरक्षित वाटावं यासाठी खूप काम केलं आहे. ते वेगळे झाले तेव्हाही आम्हाला दोघांचं समान प्रेम मिळेल, कुटुंबाला प्रेम मिळेल याची काळजी त्यांनी घेतली.” आमिर खान व रीना दत्ता यांनी १९८६ साली प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर १६ वर्षांनी २००२ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता. आमिर आणि रीनाला जुनैद खान आणि आयरा खान अशी दोन मुलं आहेत. घटस्फोटानंतर रीना दत्तानेच दोन्ही मुलांचा सांभाळ केला. घटस्फोटानंतरही आमिरचे पहिल्या पत्नीशी चांगले संबंध आहेत. आमिरने नंतर २००५ मध्ये किरण रावशी लग्न केले, पण ते सुद्धा २०२१ मध्ये वेगळे झाले. त्यांना एक मुलगा आझाद राव खान आहे. आयराबद्दल सांगायचे तर तिने जानेवारी २०२४ मध्ये फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत लग्न केले.