navarashtra planet marathi film and ott awards
‘ नवराष्ट्र’ आणि प्लॅनेट मराठीच्यावतीने आयोजित फिल्म ॲण्ड ओटीटी अवॉर्ड – २०२३ या सोहळ्याचे काऊंटडाऊन मराठी सिनेरसिकांमध्ये सुरु झाले आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ४ मे रोजी रंगणाऱ्या या सोहळ्याच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मराठी रसिकांवर गारुड करणारे अनेक अभिनेते, अभिनेत्री या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. नवराष्ट्र आणि प्लॅनेट मराठीचा हा पहिला – वहिला सोहळा असून याचे प्रक्षेपण सन टीव्हीवर होणार आहे. या सोहळ्यात कलावंतांची उपस्थिती, उत्साहाची उधळण, आनंदाची लयलूट असणार आहे.
युवकांच्या मनातील ‘युथ आयकॉन’ ‘सई ताम्हणकर’
सई ताम्हणकर नाव घेतलं की आपल्या समोर येते एक बोल्ड बिंदास , मनमिळावू, असलेली अभिनेत्री. सई ताम्हणकर ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी हिंदी आणि मराठी चित्रपट आणि दूरदर्शनमध्ये काम केल्याबद्दल ओळखली जाते. ती एक नावाजलेली आणि यशस्वी अभिनेत्री आहे. अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टींत युथ आयकॉन अभिनेत्री म्हणून देखील ओळखली जाते. एका छोट्याशा शहरातून आलेली सई ताम्हणकर एका तरूणांच्या हृदयाची धडकन झाली आहे.
सईने २००८ मध्ये, सुभाष घईच्या क्राईम थ्रिलर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये मुख्य भूमिका करत ऑन-स्क्रीन पदार्पण केले. त्याच वर्षी तिने सनई चौघडे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले या चित्रपटातील सईची सोज्वळ भूमिका प्रेक्षकांना आवडली होती.सई ताम्हणकरने अमीर खानच्या गजनी या हिंदी चित्रपटात देखील चांगली भूमिका केली. ‘नो एंट्री पुढे धोका आहे’ या चित्रपटात नो एंट्रीच्या मराठी रिमेकमध्ये बिपाशा बासूच्या बॉबी व्यक्तिरेखाचा अभिनय तिने हुबेहूब केला या चित्रपटात सईने बिकिनी घालून आपली बिंदास आणि बोल्ड अदाकारी दाखवली. मराठी फिल्म इंडस्ट्रीत बिकिनी घालणे सहजा दिसत नाही पण सई हि पहिली मराठी अभिनेत्री आहे तिने मराठी सिनेमात बिकिनी लुक दिला आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीत बोल्ड अभिनेत्री नाव निर्माण केलं.
२०१३ साली प्रदर्शित झालेल्या स्वप्नील जोशीच्या ‘दुनियादारी‘ या चित्रपटात शिरिन घाटके या भूमिकेने सईला मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळवून दिली. त्यामध्ये तिची केलेली ऍक्टिंग सर्वांना खूप आवडली दुनियादारीतील शिरिन सारखी आपली प्रेयसी असावी असं प्रत्येक तरूणांची ईच्छा होती. दुनियादारी मधली बिंदास प्रेमळ शिरिन ची भूमिका करणारी सई क्लासमेंट मधली रावडी अप्पु देखील प्रेक्षकांना आवडली. सईने आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, वेबसिरीज काम केले आहे. सई एकच प्रकारच्या भूमिकेत न अडकता विविध प्रकारच्या भूमिकांमध्ये ती चमकली.सईची प्रत्येक चित्रपटातील भूमिका एक वेगळ्याच स्तरावर असते. हिंदी फिल्म हंटर या बॉलिवूडमधील चित्रपटात तिची ज्योत्सना ही भूमिका चांगलीच गाजली होती तर मिमी मधली चांगल्या मैत्रिणीची भूमिका उत्तमरित्या केली आहे. सई ताम्हणकरला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तिला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.फक्त सईसाठी चित्रपट पाहणारे लाखो चाहते आहे. सई ताम्हणकर प्रचंड बिनधास्त आणि रोखठोक आहे.
‘ओटीटी’वर प्राजक्ताची छाप
‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेमध्ये अभिनय करणारी ते महाराष्ट्राची हास्यजत्रामधून घराघरात ओळखली जाणारी, तरुणांचे क्रश असलेली प्राजक्ता माळी सध्या ओटीटीवर आपली छाप पाडत आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सातत्याने चर्चेत असते. ती कायमच तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. सोज्वळ आणि सात्विक भूमिका असो किंवा बोल्ड भूमिका असो या दोन्ही भूमिकेत आपली अदाकरी दाखवली आहे. प्राजक्ता माळीची जास्त चर्चा होत आहे ती ओटीटीवर. प्राजक्ता माळीच्या ‘रानबाजार’ या वेबसिरीजने ओटीटीवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या वेबसिरीजमधून प्राजक्ताने पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्म वर पाऊल ठेवले. ‘रानबाजार’ या वेबसीरिजमध्ये प्राजक्ता पहिल्यांदाच इतक्या हटके लूकमधून प्रेक्षकांसमोर येणार आली. प्राजक्ताच्या भूमिकेबद्दल सांगायचं तर यापूर्वी अशा प्रकारची भूमिका प्राजक्ताने कधीच साकारली नव्हती. या भूमिकेमुळे प्राजक्ता ची ‘बबली’ इमेज बदलली. रत्ना साकारणे नक्कीच सोपे नव्हते. यात तिने कामाठीपुरामधील सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. रत्ना असे तिच्या पात्राचे नावं होतं. यावेळी तिने काही बोल्ड सीनही दिले होते.
विविधांगी भूमिका साकारणारी तेजस्विनी
अनेक मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका करणारी तेजस्विनी पंडित ओटीटीवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने मराठी चित्रपटापेक्षा वेबसिरीजमधून जास्त चर्चेत आहे. तेजस्विनीने आतापर्यंत ‘अनुराधा’, ‘अथांग’,‘समांतर’ आणि ‘रानबाजार’ या वेबसिरीजमधून वेगळीच भूमिका प्रेक्षकांना दाखवली आहे. ‘रानबाजार’मध्ये तेजिस्वनी पुन्हा एकदा अशीच बोल्ड अवतारामध्ये नव्या वेबसिरीजमध्ये दिसली आहे. तेजस्विनीने यामध्ये देहविक्रेय महिलेची भूमिका साकारली.
‘अथांग’मधून निवेदिता सराफ ओटीटीवर
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री निवेदिता सराफ सध्या कलर्स वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. निवेदिता यांनी चित्रपटातून ९०चा काळ गाजवला. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘माझा छकुला’, ‘देऊळ बंद’ आता निवेदिता सराफ वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे ते पण ओटीटीवर. निवेदिता सराफ ‘अथांग’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आली . या वेबसिरीजमधून निवेदिता सराफ यांनी पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्म वर पाऊल ठेवले आहे. या वेब सीरिजमध्ये त्या ‘आऊ’ ही भूमिका साकारली आहे. या वेब सिरीजमधली त्यांची भूमिका वेगळी होती.