nawazuddin siddiqui in haddi
नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) अभिनित आगामी चित्रपट ‘हड्डी’ची (Haddi) घोषणा झाल्यापासून याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. चित्रपटाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच आणखी कलाकार पाहण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत. अशातच या चित्रपटाबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. नवाजुद्दीन या चित्रपटात एक अनोखे पात्र साकारणार आहे. ‘हड्डी’साठी वास्तविक जीवनातील ट्रान्सजेंडर महिलांसोबत काम करण्याचा त्याचा अनुभव त्याने शेअर केला.
Crime has a new avatar?
Started filming fr dis noir revenge drama #Haddi
Releasing 2023@AkshatAjay @rajesh_rosesh #SaurabhSachdeva @ShreeDharDubey @jayoza257 @ravibasrur @sanjaysaha06 @iamradhikananda #AnanditaStudios @ZeeStudios_ @ZeeMusicCompany @zeecinema @WallsAndTrends pic.twitter.com/qzIrS311mv — Nawazuddin Siddiqui (@Nawazuddin_S) August 23, 2022
[read_also content=”शिंदे- ठाकरे गटाचे मनोमिलन होणार ?; राजकीय तर्क वितर्कांना उधाण https://www.navarashtra.com/maharashtra/will-the-shinde-thackeray-group-reconcile-challenge-political-arguments-nrdm-345612/”]
अनोखे आणि खास पात्र साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेला नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या आगामी चित्रपटात यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ८० हून अधिक ट्रान्सजेंडर महिलांसोबत काम करण्याचा आपला अनुभव शेअर करताना नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, “वास्तविक जीवनातील ट्रान्सजेंडर महिलांसोबत काम करणे हा एक अनोखा अनुभव आहे. या समाजाबद्दल अधिक समजून घेणे आणि त्यांना जाणून घेण्याची संधी मला मिळाली, हे मी माझं भाग्य मानते. त्यांची येथील उपस्थिती प्रभावी होती. ” नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनित ‘हड्डी’ २०२३ मध्ये प्रदर्शित प्रदर्शित होणार आहे.