नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाचा परदेशात डंका, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला सन्मान
न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये (NYIFF) प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याला त्याच्या आगामी चित्रपटातील एका भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकी लवकरच “I Am Not An Actor” मधील अभिनयासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेहमीच दमदार, प्रभावी आणि वास्तववादी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ओळखला जाणाऱ्या नवाजुद्दीनने या चित्रपटात एक अत्यंत साधा पण प्रभावी अभिनय सादर केला आहे. हा चित्रपट ओळख, दिखावा आणि मनातील संघर्ष यांची गुंफण मांडते. नवाजुद्दीन यांच्या सहज अभिनयामुळे प्रेक्षक आणि समीक्षक दोघेही भारावून गेले आहेत.
७ चित्रपट, १ विश्व, अगणित कथा; ‘महावतार युनिव्हर्स’ची भव्यदिव्य घोषणा
“आय अॅम नॉट अॅन अॅक्टर” (I Am Not An Actor) या चित्रपटाचे NYIFFमध्ये अधिकृत स्क्रीनिंग झाले असून, यामुळे नवाजुद्दीन यांचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधील सहभाग आणखी बळकट झाला आहे. त्यांच्या चित्रपटांना नेहमीच अर्थपूर्ण कथा आणि उत्कृष्ट अभिनयामुळे जागतिक फेस्टिव्हल्समध्ये स्थान मिळत आले आहे. या चित्रपटात त्यांची भूमिका शांत असूनही प्रभावी आहे. कोणताही अतिरेक न करता, त्यांनी अत्यंत संयततेने आणि सच्चेपणाने सादर केलेली व्यक्तिरेखा प्रेक्षकांना अंतर्मुख करते. हा पुरस्कार नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या त्या अभिनयप्रवासाला पुढे नेतो आहे, जिथे त्यांनी छोट्या बजेटच्या चित्रपटांपासून ते मोठ्या व्यावसायिक चित्रपटांपर्यंत सर्वच प्रकारात आपली छाप पाडली आहे.
वय केवळ आकडा! ‘गाडी नंबर १७६०’मध्ये सुहास जोशींनी साकारले ॲक्शन सीन्स
गेल्या काही वर्षांत त्यांनी अशा भूमिका निवडल्या आहेत ज्या केवळ मनोरंजनपर नसून अभिनयाला एक नवे परिमाण देणाऱ्या आहेत. NYIFF मधील हा सन्मान हे सिद्ध करतो की नवाजुद्दीन सिद्दीकी हे आजच्या काळातील सर्वांत विश्वासार्ह आणि प्रतिभावान कलाकारांपैकी एक आहेत. ते नेहमीच अशा स्क्रिप्ट्सची निवड करतात ज्यात कथा केंद्रस्थानी असते आणि अभिनयाला व्यापक वाव मिळतो. “आय अॅम नॉट अॅन अॅक्टर” ही त्यांच्या अशाच निवडींची आणखी एक ठोस उदाहरण आहे.
लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकी “रात अकेली है २”, “नूरानी चेहरा”, “थमा” आणि “संगीन” या चित्रपटांत दिसणार असून, प्रत्येक प्रोजेक्टमधून ते विविध भूमिका साकारताना दिसतील. हे प्रोजेक्ट्स विविध शैलींशी संबंधित असून, त्यांच्या अभिनयाची नवी रूपं आणि गूढता उलगडणार आहेत.