Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लंपनचं जग जवळून पाहता येणार! प्रकाश नारायण संत यांच्‍या आवडत्‍या पात्राला भेटा ओटीटीवर

प्रकाश नारायण संत यांची लोकप्रिय कादंबरी ‘वनवास'वर आधारित लंपन वेबसिरिजमध्ये एका लहान मुलगा आणि त्याचं गावात आजीआजोबासोबतचं आयुष्य दाखवण्यात आलं आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 13, 2024 | 03:27 PM
लंपनचं जग जवळून पाहता येणार! प्रकाश नारायण संत यांच्‍या आवडत्‍या पात्राला भेटा ओटीटीवर
Follow Us
Close
Follow Us:

मराठी सिनेविश्वाप्रमाणे आता मराठी ओटीट विश्वातही नवेनवे प्रयोग होत आहेत. विविध विषयावरील चित्रपट, वेबसिरज सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्याचप्रमाणे प्रादेशिक भाषांमधील कंटेटही वेबसिरिजच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे. आता प्रकाश नारायण संत यांच्या कादंबरीवर आधारित एक सीरिज प्रेक्षकांना ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. या सीरिजचं नाव ‘लंपन’ (Lampan)असं आहे. नारायण संत यांची लोकप्रिय कादंबरी ‘वनवास’वर आधारित या निरागस व आत्‍म-शोधाच्‍या हृदयस्‍पर्शी कथेमध्‍ये मिहिर गोडबोले यांनी प्रतिष्ठित भूमिका लंपन साकारली आहे. ही सिरीज १६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

[read_also content=”करीना कपूर सैफ अलीनं पापाराझींसमोरच एकमेकांना केलं किस, नेटिझन्सने सुरू केलं ट्रोलींंग https://www.navarashtra.com/movies/saif-ali-khan-kareena-kappr-kissed-each-other-in-front-of-paparazzi-netizens-trolled-them-nrps-532853.html”]

मराठी साहित्‍याची जादू असलेली ही सिरीज तरूण मुलगा लंपनच्‍या आत्‍म-शोधाच्‍या प्रयत्‍नांच्‍या कथेला सादर करते. मिहिर प्रमुख भूमिकेत असलेल्‍या या सिरीजमध्‍ये प्रतिभावान कलाकार देखील आहेत जसे लंपनच्या ‘आजी’च्‍या भूमिकेत गीतांजली कुलकर्णी, त्‍याच्‍या आजोबाच्‍या भूमिकेत चंद्रकांत कुलकर्णी, त्‍याची जिवलग मैत्रिण सुमीच्‍या भूमिकेत अवनी भावे आणि त्‍याच्‍या वडिलांच्‍या भूमिकेत पुष्‍कराज चिरपुटकर व त्‍याच्‍या आईच्‍या भूमिकेत कादंबरी कदम आहे.

आपल्‍या भूमिकेबाबत सांगताना गीतांजली म्‍हणाल्‍या, “मी प्रकाश नारायण संत जी यांच्‍या लक्ष वेधून घेणाऱ्या कथा ऐकत मोठे झाले आणि त्‍यांच्‍या कथांमधील जादुई विश्‍वाने नेहमी माझे लक्ष वेधून घेतले. आता, त्‍यांच्‍या लोकप्रिय कलाकृतीमधील एका पात्राची भूमिका साकारताना मला खूप आनंद होत आहे. लंपनच्‍या आजीची भूमिका साकारण्‍याचा अनुभव अद्वितीय आहे. तिला प्रेमाने आजी म्‍हणून हाक मारतात. ती लंपनवर प्रेमाचा वर्षाव करते, तसेच त्‍याला मार्गदर्शन देखील करते, आपुलकी दाखवण्‍यासह शिस्‍तबद्धतेचे धडे देते. जुन्‍या आठवणींकडे घेऊन जात ही सिरीज तुम्‍हाला सहजगत्या काळाचा अनुभव देते, जेथे कौटुंबिक नाते आणि बालपणातील निरागसतेला अधिक महत्त्व दिले जाते.”

निपुण धर्माधिकारी दि‍ग्‍दर्शित या सिरीजचे निर्माते श्रीरंग गोडबोले, ऋषिकेश देशपांडे, अमित पटवर्धन आहेत. तरूण मुलगा लंपन बालपणीच्‍या गुंतागुंतीमधून जाण्‍याच्‍या रोमांचक प्रवासाचा अनुभव घ्‍या, जेथे तो ओळख व आपलेपणाच्‍या शोधावर जातो. लंपन ही वेबसिरिज १६ मेपासून सोनी लिव्‍हवर पाहता येणार आहे.

Web Title: Nihit godbole girija kulkarni chandrakant kulkarni lampan webseries wiil steram on sony live nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2024 | 03:27 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.