Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅनेडियन डान्सर ते बॉलिवूडची टॉप आयटम गर्ल; कसा आहे अभिनेत्री नोरा फतेहीचा प्रवास? जाणून घ्या…

मॉडेल, बेली डान्सर आणि अभिनेत्री अशा बहुआयामी नोरा फतेहीचा आज वाढदिवस आहे. तिने आपल्या आरस्पानी सौंदर्यावर आणि मादक डान्स मुव्हजने प्रेक्षकांचे मन जिंकलेय. प्रसिद्ध झालेल्या नोराचा इथवरचा प्रवास सोप्पा नव्हता.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 07, 2025 | 10:53 AM
कॅनेडियन डान्सर ते बॉलिवूडची टॉप आयटम गर्ल; कसा आहे अभिनेत्री नोरा फतेहीचा प्रवास? जाणून घ्या…

कॅनेडियन डान्सर ते बॉलिवूडची टॉप आयटम गर्ल; कसा आहे अभिनेत्री नोरा फतेहीचा प्रवास? जाणून घ्या…

Follow Us
Close
Follow Us:

मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्री अशा बहुआयामी नोरा फतेहीचा आज वाढदिवस आहे. तिने आपल्या आरस्पानी सौंदर्यावर आणि मादक डान्स मुव्हजने प्रेक्षकांचे मन जिंकलेय. चाहत्यांमध्ये, बेली डान्सर म्हणून प्रसिद्ध झालेल्या नोराचा इथवरचा काही सोप्पा नव्हता.  नोराचा जन्म ६ फेब्रुवारी १९९२ रोजी कॅनडामध्ये झाला. आज नोरा तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.

सोशल मीडियावर नोराचे लाखो फॅन्स आहेत. ‘रोर : टायगर ऑफ द सुंदरबन्स’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिला टॉलिवूडमध्येही अनेक संधी मिळाल्या. नोरा फतेहीच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने तिच्या आयुष्याशी संबंधित अशा अनेक खास गोष्टी जाणून घेऊया…

ॲक्शन आणि हॉररचा मेगा डोस Ultra Jhakas OTT वर प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार, पाहा यादी…

अतिशय खडतर प्रवास करून बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण करण्यासाठी तिने वयाच्या १६ व्या वर्षापासून काम सुरु केलं आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. कुटुंबाची जबाबदारी नोराच्या खांद्यावर होती. नोराने आपल्या भावाला लहानाचं मोठं करण्यासाठी फार कठोर परिश्रम घेतले होते. तिने घरातल्यांचं पालन पोषण करण्यासाठी टेलिमार्केटिंग, वेट्रेसिंग, बार्टेंडिंग आणि कॅफेमध्ये काम केलं आहे. याच दरम्यान नोराला तिची स्वप्नं अपूर्ण राहत असल्याचं जाणवलं. आपले स्वप्न अपूर्ण राहत असल्याचं तिला जाणवू लागल्यावर तिने मोरोक्कोहून भारत गाठलं. भारतात आल्यानंतरही तिच्या नशीबात मेहनत कायम होतीच.

स्त्रीशक्तीचा जागर; आई तुळजाभवानीचा अद्वितीय दृष्टिकोन येणार समोर!

ती संधीच्या शोधात तासनतास रांगेत उभी राहायची, पण केव्हा नोराने हार मानली नाही. ‘रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’ आणि प्रकाश झा यांच्या प्रोजेक्टमधून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये करत तिने अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केलं. इंडस्ट्रीत अनेक नकारांना सामोरे जावे लागल्यानंतरही नोराने आपलं स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. कायमच तिच्या अभिनयाचीच नाही तर, फॅशनचीही जोरदार चर्चा चाहत्यांमध्ये होते. नोरा केवळ एक उत्तम डान्सरच नाही, तर मार्शल आर्ट्समध्येही माहिर आहे. नोरा फतेहीने बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीलाही डान्स शिकवला आहे.  नोरा फतेही इंग्रजी आणि हिंदीशिवाय फ्रेंच आणि अरबी भाषाही बोलू शकते.

‘लागिरं झालं जी’ फेम निखिल चव्हाणचं रंगभूमीवर पदार्पण, एक नव्हे तर दोन नाटक गाजवणार…

रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या नऊव्या सीझनमध्ये झळकल्यानंतर नोराने प्रेक्षकांमध्ये एक अव्वल स्थान निर्माण केले आहे. सलमान खानच्या या शोमध्ये जो कोणी येतो, तो ओळख निर्माण करूनच जातो, हे नक्की आहे. यानंतर 2016 मध्ये ‘झलक दिखला जा’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये नोराने तिची डान्सची प्रतिभा दाखवली. नोरा क्रिकेटची प्रचंड मोठी फॅन असून ती सचिन तेंडुलकरची मोठी फॅन आणि युवराज सिंगची चांगली मैत्रीण आहे. बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाचा पती अंगद बेदी ह्याला नोराने अनेक वर्षे डेट केले होते. अनेक काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांचेही ब्रेकअप झाले. ब्रेकअपमधून सावरण्यासाठी तिला फार वेळ लागल्याचे तिने सांगितले होते. २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबतही नोराचं नाव जोडलं होतं. त्याच्याकडून तिने काही गिफ्ट्स घेतल्याचाही तिच्यावर आरोप होता.

Web Title: Nora fatehi birthday her journey to become bollywood dancing sensation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 07:45 AM

Topics:  

  • Nora Fatehi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.