धमाकेदार मनोरंजनाच्या शोधात आहात? तर थांबा, फेब्रुवारी महिन्यात चित्रपटगृहात गाजलेले ते साऊथ, हॉलीवूड मधील सुपरहिट चित्रपट मराठी भाषेत उपलब्ध करत आहोत जे तुम्हाला घरबसल्या पाहता येतील आणि मनोरंजनाचा पुरेपूर आनंद लुटता येईल, आता ते चित्रपट कोणते ते पाहूया…
ॲक्शन आणि हॉररचा मेगा डोस Ultra Jhakas OTT वर प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार, पाहा यादी...
'अँटनी' (Antony) हा मल्याळम भाषेतील ब्लॉकबस्टर ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. हि कहाणी अँटनी नावाच्या गँगस्टरची आहे, जो आपल्या हत्या झालेल्या शत्रूच्या मुलीची ॲन मारियाची काळजी घेतो. मात्र हे सर्व त्याच्या शत्रूला समजतं आणि तो गैरसमज निर्माण करून त्याच्या आयुष्यात अडथळे आणतो.
साऊथच्या या धमाकेदार चित्रपटाबरोबरच हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट 'अब्राकडाब्रा' (Abrakadabra) हा एक हॉरर चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे, ज्याची कथा एका जादूगाराच्या आयुष्याशी सबंधित आहे, जो आपल्या मृत बापाच्या जादूच्या रहस्याचा उलगडा करताना एक भयानक शक्तीला सामोरे जातो. हे दोन्ही कमालीचे चित्रपट आपल्या मायबोली मराठीत १४ फेब्रुवारी २०२५ ला अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर पहायला मिळतील.
नुकताच जानेवारी २०२५ महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या 'जिलबी' (Jilabi) चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंट यांच्या सहयोगाने आणि नितीन कांबळे यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर २१ फेब्रुवारी २०२५ ला अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर होणार आहे. हि कहाणी आहे दोन ,मोठ्या उद्योगपती आणि त्यांच्याभोवती फिरणाऱ्या गूढ रहस्याची आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, स्वप्नील जोशी, शिवानी सुर्वे, अश्विनी चवरे हि तगडी स्टारकास्ट तुम्हाला पाहायला मिळेल.
‘कुडी येडामैथे’ ही विज्ञानकथा असलेली तेलगू भाषेतील सुपरहिट वेब सिरीज २८ फेब्रुवारी २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर येत आहे. या वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत असणारा विष्णू आणि एक पोलीस अधिकारी एका गूढ गुन्ह्याचा तपास करत असतात आणि या तपासादरम्यान त्यांना एक मुलगी सापडते जी एका टाइम लूपमध्ये अडकलेली असते. ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात येतात आणि एका षडयंत्राचा उलघडा होतो. या वेगवेगळ्या घटनांमुळे त्यांच्या निर्णयांची दिशा आणि परिणाम बदलतात, ज्यामुळे सिरीजला एक नवे वळण येते.