अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतील गॅलक्सी अपार्टमेंटबाहेरील गोळीबार (Salman Khan House Firing Case) प्रकरणी रोज काही ना काही नवी माहिती समोर येत आहे. एक-दोन दिवसापुर्वीच या प्रकरणातील आरोपींवकर मकोका लावण्यात आला, आता या प्रकरणी एक धक्काकदायक माहिती समोर येत आहे. सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चौघांपैकी एकाने तुरुंगात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अनुज थापन असं त्याचं नाव आहे. घटनेनंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.
[read_also content=”अभिनया नंतर आता राजकारण क्षेत्रही गाजवणार, ‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपालीनं गांगुलीनं भाजपमध्ये केला प्रवेश! https://www.navarashtra.com/movies/anupama-fame-actress-rupali-ganguli-join-bjp-nrps-528901.html”]
मुंबई पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे. त्यापैकी दोघांनी सलमानच्या घरावर गोळीबार केला होता. या आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आली होती. तर, या आरोपींना पिस्तुल पुरवल्याप्रकरणी पंजाबमधून सोनू चंदर आणि अनुज थापन या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी अनुज थापनने आज तुरुंगात चादरीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला.
१४ एप्रिल रोजी रविवारी पहाटे 5 वाजताअभिनेता सलमान खानच्याॉ मुंबईतील गॅलक्सी अपार्टमेंटबाहेर दोघांनी गोळीबार केला. या प्रकरणी दोन आरोपींना गुजरातमधील भुज येथून अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. मुंबई गुन्हे शाखेने सोमवारी सूरतमधील तापी नदीतून दोन बंदूक आणि काही जिवंत काडतुसे जप्त केली. तसेच अटकेतीस आरोपींच्या कोठडीत वाढ करण्यात आली असून आता एनआयए दोन्ही आरोपींची चौकशी करत आहे.