दिवाळीनंतर प्रेक्षकांसाठी ओटीटीवर मनोरंजनाचा जबरदस्त धमाका, एकदा यादी वाचाच
प्रेक्षकांसाठी ओटीटी हे माध्यम मनोरंजनाचं उत्तम माध्यम मानले जाते. दर आठवड्याला ओटीटीवर वेगवेगळ्या धाटणीचे प्रोजेक्ट रिलीज होत असतात. यामध्ये वेब फिल्म, वेब सीरिज, वेब शो आणि थिएटरमध्ये रिलीज झालेल्या चित्रपटांचाही समावेश होतो. या आठवड्यात ओटीटीवर क्राईम, थ्रिलर, कॉमेडी असे विविध प्रकरचे चित्रपट व वेब सीरिज रिलीज होणार आहेत, जाणून घेऊया यादी…
विजय 69 – Vijay 69
इमोशनल ड्रामा ‘विजय 69’ (Vijay 69) OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स (Netflix) वर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 8 नोव्हेंबरला अर्थात आज रिलीज झाला आहे. चित्रपटात अनुपम खेर, चंकी पांडे आणि मिहिर आहुजा अशी तगडी स्टारकास्ट मुख्य भूमिकेत आहे.
द बकिंघम मर्डर्स – The Buckingham Murders
अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये दमदार पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवणारा ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ (The Buckingham Murders) चित्रपट आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. करीना कपूरचा हा चित्रपट 8 नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
हे देखील वाचा – अभिनेता निखिल दामलेच्या आयुष्यात ‘तिची’ एंट्री, चेहऱ्यावरील आनंद लपेना! दाखवली झलक
सिटाडेल: हनी बनी- Citadel Honey Bunny
प्रियंका चोप्राची अमेरिकन वेबसीरीज ‘सिटाडेल’ चं हिंदी वर्जन ‘सिटाडेल: हनी बनी’ (Citadel Honey Bunny) ७ नोव्हेंबरला प्राईम व्हिडीओवर रिलीज झाली आहे. या सिरीजमध्ये समंथा रुथ प्रभु, वरुण धवन, एम्मा कॅनिंग, केके मेनन, सिकंदर खेर, साकिब सलीम, रायमुंडो क्वेरिडो आणि काशवी मजमुंदर मुख्य भुमिकेत आहेत.
देवरा- Devara
ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खानचा ‘देवरा’ (Devara) चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. ८ नोव्हेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.
वेट्टैयान- Vettaiyan
रजनीकांत यांचा ‘वेट्टैयान’ (Vettaiyan) चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर रिलीज झाला. चित्रपट आता ८ नोव्हेंबरला ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे.