अभिनेता निखिल दामलेच्या आयुष्यात 'तिची' एंट्री, चेहऱ्यावरील आनंद लपेना! दाखवली झलक
टिव्ही अभिनेता निखिल दामले ‘बिग बॉस मराठी ४’ मुळे महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्ध झाला. अनेक टेलिव्हिजन मालिकांमधून महाराष्ट्रातल्या घराघरांत पोहोचलेला निखिल दामले नेहमीच इन्स्टाग्रामवर सक्रिय असतो. तो कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत राहण्याचा प्रयत्नात असतो. सध्या निखिल दामले सोशल मीडियावर त्याने नवीन कार घेतल्यामुळे चर्चेत आला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.
अभिनेत्याने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना नवीन कार घेतल्याची माहिती दिली आहे. “आमच्या घरी नव्या सदस्याचे स्वागत आहे…” असं कॅप्शन देत अभिनेत्याने नवीन कार खरेदी केल्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्याने “टाटा नेक्सॉन” कार खरेदी केल्याची दिसत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, निखिल दामले आणि त्याचे कुटुंबीय कारवरील पडदा हटवताना दिसले. त्यानंतर त्याच्या आईने, अभिनेत्याच्या आजी- आजोबांनी आणि स्वत: अभिनेत्याने नव्या कारची पूजाही केली. यावेळी सर्वांच्याच चेहऱ्यावरील आनंद अगदी स्पष्टपणे पाहायला मिळत होता.
अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांसह काही सेलिब्रिटी मित्रांनीही त्याला शुभेच्छा दिल्या. ‘बिग बॉस मराठी ४’च्या घरातील निखिलच्या काही मित्रांनीही त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. यामध्ये, पुरूषोत्तम दादा पाटील आणि अभिजीत सावंतने निखिलवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. टेलिव्हिजन अभिनेत्री सानिया चौधरी आणि समृद्धी केळकरनेही निखिल दामलेचे अभिनंदन केले आहे. निखिल दामलेबद्दल सांगायचे तर, तो टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध सेलिब्रिटींपैकी एक आहे. त्याने ‘हृदयात वाजे समथिंग’, ‘अल्मोस्ट सुफल संपूर्ण’, ‘यशोदा- गोष्ट श्यामच्या आईची’, ‘रमा राघव’ सारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये त्याने काम केले आहे. ‘रमा राघव’ मालिकेमध्ये राघवचं पात्र त्याने साकारलं होतं. या मालिकेनेही त्याला चांगलीच प्रसिद्धी दिली. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातही स्पर्धक म्हणून निखिल दामले प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. कमी व्होट्स मिळाल्यामुळे त्याला काही दिवसांतच घराबाहेर पडावे लागले.
हे देखील वाचा – Good News! Athiya Shetty आणि KL Rahul होणार आई-बाबा, ‘या’ महिन्यात देणार बाळाला जन्म