अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी 25 सप्टेंबरला जोधपूरला शाही सोहळ्यात लग्नगाठ बांधली (parineeti chopra raghav chadha wedding) आता हे नवविवाहीत जोडपं त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. अलीकडेच त्यांनी अनेक छायाचित्रे शेअर करून चाहत्यांना त्याच्या आयुष्यातील सुंदर क्षणांची झलक दाखवली. आता परिणीतीने लग्नानंतरचा पहिला फोटो शेयर केला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’मध्ये परिणीती आणि राघव यांचा शाही विवाहसोहळा पार पडल्यानंतर परिणीतीने अनेक सुंदर व्हिडिओ आणि फोटो शेअर केले. लग्नापूर्वी राघव आणि चड्ढा कुटुंबात क्रिकेट सामना झाला होता. आता परिणीतीने दोन्ही कुटुंबात क्रिकेट मॅच खेळत असल्याचे फोटो शेअर केले आहे.
परिणीतीने तिच्या सकाळच्या रुटीनचा फोटो केला शेयर
परिणीतीने इंस्टाग्राम स्टोरीवर सुडोकू खेळतानाचा एक फोटो शेअर केला आहे. कॉफी पीत असताना परिणीतीने संपूर्ण सुडोकू गेम सोडवला.
राघव-परिणितीची लव्हस्टोरी
ब्रेकफास्ट टेबलवर बोलत असताना राघव आणि परिणीतीची प्रेमकहाणी सुरू झाली. दोघेही करिअर सुरू करण्यापूर्वी एकमेकांना ओळखत होते. दोघांनीही इंग्लंडमधून शिक्षण घेतले आहे. परिणीतीने मँचेस्टर बिझनेस स्कूलमधून बिझनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्समध्ये ट्रिपल ऑनर्सचे शिक्षण घेतले. तर राघवने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे. मात्र, परिणीती पंजाबी चित्रपट ‘चमकिला’चे शूटिंग करत असताना त्यांच्या अफेअरला सुरुवात झाली. राघव त्याला भेटायला आला होता. या भेटीनंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले. 25 सप्टेंबर रोजी उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’मध्ये दोघही लग्नाच्या बेडीत अडकले.
Web Title: Parineeti chopra raghav chadha share photo enjoying playing cricket nrps