
‘पोन्नियिन सेल्वन-1’ या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधून जवळपास 16.80 कोटी रुपये कमावले होते. 500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषांमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे. ज्याची कथा साम्राज्यावर आधारित आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, चियान विक्रम, त्रिशा कृष्णन, ऐश्वर्या लक्ष्मी, कार्ती, शोभिता धुलिपाला आणि जयराम रवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन राजकुमारी नंदिनीच्या भूमिकेत आहे. मणिरत्नम दिग्दर्शित या चित्रपटाच्या हिंदी पट्टय़ाने जवळपास 2 कोटींची कमाई केली आहे. त्याच वेळी, चित्रपटाच्या इतर भाषांनी एकूण 38 कोटी रुपये कमवले. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.