Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Phullwanti Trailer : दमदार कथा, उत्कृष्ट निर्मितीमूल्य आणि नृत्य- संगीताचा नेत्रसुखद अविष्कार; ‘फुलवंती’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Phullwanti Trailer Out : ‘अख्खा हिंदुस्थान गाजवला, आता पुण्याला नादावणार आपली फुला’ अशा ठसकेबाज तोऱ्यात आपल्या मनमोहक अदाकारीने, नृत्याच्या सुंदर आविष्काराने सर्वांना भुरळ पाडणारी 'फुलवंती'चा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. उत्तम कथानक, नृत्य- संगीत, मराठी संस्कृती आणि पेशवेकाळातील भव्यता यांचा सुंदर मिलाफ असणारी ही कलाकृती आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Oct 05, 2024 | 11:20 AM
प्राजक्ता माळीचा क्रश कोण ? म्हणाली, "त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा..."

प्राजक्ता माळीचा क्रश कोण ? म्हणाली, "त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा..."

Follow Us
Close
Follow Us:

‘अख्खा हिंदुस्थान गाजवला, आता पुण्याला नादावणार आपली फुला’ अशा ठसकेबाज तोऱ्यात आपल्या मनमोहक अदाकारीने, नृत्याच्या सुंदर आविष्काराने सर्वांना भुरळ पाडणारी ‘फुलवंती’ आपल्या भेटीला येतेय. तिच्या येण्याची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच ; फुलवंती’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लक्ष वेधून घेतोय. ट्रेलरमध्ये ‘फुलवंती’च्या भूमिकेतील प्राजक्ता माळी आणि प्रकांडपंडीत व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री भूमिकेतील गश्मीर महाजनी यांच्यावरून नजर हटत नाही. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ कादंबरी, चित्रपटरूपात ११ ऑक्टोबरला आपल्यासमोर येणार आहे.

हे देखील वाचा – ‘दो पत्ती’ चित्रपटात शाहीर शेख करणार अभिनेत्री क्रिती सेनॉनसह रोमान्स!

उत्तम कथानक, नृत्य- संगीत, मराठी संस्कृती आणि पेशवेकाळातील भव्यता ; यांचा सुंदर मिलाफ असणारी ही कलाकृती रसिकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. “मराठीत सिनेसृष्टीत नेहमीच उत्तमोत्तम आशयाचे चित्रपट बनतात. त्यातूनच प्रेरणा घेऊन मीही एका मराठी चित्रपटाची निर्मिती करतेय, याचा मला आत्यंतिक आनंद आहे. प्रादेशिक सिनेमे आशयघन असतात, ही बाब मला फार आवडते. एका चांगल्या संकल्पने सोबतच; ताकदीच्या कलाकारांची फौज, उत्तमोत्तम तंत्रज्ञ, संवेदनशील दिग्दर्शन आणि वेगळ्या धाटणीचा तरीही कौटुंबिक असणारा ‘फुलवंती’ हा चित्रपट; लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आवडेल,”असा विश्वास प्राजक्ताने व्यक्त केला.

‘फुलवंती’ ही भारतभर किर्ती असलेली नर्तिका; कार्यक्रमाच्या निमित्तानं तिचं पुण्यात – पेशवे दरबारात येणं होतं. तिथे तिची व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्याशी भेट होते. त्यांच्या भेटीनंतर तिच्या आयुष्याला अनपेक्षित वळण लागतं. नृत्यांगना ‘फुलवंती’ आणि प्रकांडपंडीत ‘व्यंकट शास्त्री’ यांच्यातील पैज व आव्हानावर हा चित्रपट बेतला आहे. कला व बुद्धिमत्तेतील युद्ध आपण यात पाहणार आहोत. या दोघांसह या चित्रपटात; प्रसाद ओक, ऋषिकेश जोशी, स्नेहल तरडे, वैभव मांगले, मंगेश देसाई, जयवंत वाडकर, समीर चौघुले, चिन्मयी सुमित, सविता मालपेकर, विभावरी देशपांडे, क्षितीश दाते, गौरव मोरे, वनिता खरात, रोहित माने, पृथ्वीक प्रताप, चेतना भट,विजय पटवर्धन, सुखदा खांडकेकर, अदिती द्रविड, निखिल राऊत, दीप्ती लेले, राया अभ्यंकर आदि मराठीतील कलाकारांची फौज दिसणार आहे.

हे देखील वाचा- नवा सिझन, नवे स्पर्धक पाहा बिग बॉस १८ च्या नव्या घराची झलक

पॅनोरमा स्टुडिओज सादर करत आहेत… ‘फुलवंती’ मंगेश पवार अँड कं. आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ही भव्य कलाकृती ११ ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक,अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. अमोल जोशी प्रोडक्शन, मुरलीधर छतवानी,रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

Web Title: Prajakta mali and gashmir mahajani upcoming phullwanti marathi movie trailer released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 11:17 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.