(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
‘दो पत्ती’ चित्रपटामधील नुकतेच पहिले ‘रांजण’ हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या हृदयस्पर्शी ब्रेकअप गाण्यात कृती सेनॉन दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत हार्टथ्रोब शाहीर शेख देखील दिसत आहे. गाण्याचे भावपूर्ण बोल आणि मधुर ट्यून ब्रेकअपनंतरच्या वेदना आणि तळमळ उत्तम प्रकारे दर्शवतात. दोघांमधील ऑनस्क्रीन केमिस्ट्रीकडे दुर्लक्ष होत नाही आहे. तसेच या चित्रपटात दोन बहिणी एकाच पुरुषावर प्रेम करत असल्याने खळबळ उडालेली पाहायला मिळणार आहे. गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये तो शेवटी एका बहिणीशी लग्न करताना दिसत आहे. रोमान्स आणि ब्रेकअपच्या कथेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणार आहे.
‘दो पत्ती’ चित्रपटामध्ये पहिल्यांदाच क्रिती निर्माती म्हणून पदार्पण करत आहे, तर शाहीर शेखचा हा बॉलिवूडमधील हा पहिला चित्रपट आहे. भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रसिद्ध नाव, शाहीर मोठ्या पडद्यावर आपली जादू दाखवणार असून, “रांजण” गाण्यामध्ये तो अभिनेत्रींसोबत चमकला आहे. त्याचा या चित्रटामधील अभिनय आणि कथा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
“रांजण” हा शाहीरच्या बॉलीवूडमधील वाढत्या ओळखीचा दाखला आहे, ज्याने त्याला एक प्रतिभावान आणि भावनिक अभिनेता म्हणून स्थापित केले आहे. त्याला या नव्या अवतारात पाहून त्याच्या चाहत्यांना आनंद होईल आणि या गाण्यातली भावनिक खोली प्रेक्षकांच्या मनाला भिडणार आहे. आता “रांजण” हे गाणं चाहत्यांच्या मनात बसले आहे.
हे देखील वाचा- Bigg Boss 18 : नवा सिझन, नवे स्पर्धक पाहा बिग बॉस १८ च्या नव्या घराची झलक
क्रिती सेनन ‘दो पत्ती’ मध्ये दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 25 ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात काजोल आणि क्रिती सेनन व्यतिरिक्त शाहीर शेख आणि शशांक चतुर्वेदी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत असल्यामुळे हा चित्रपट फक्त प्रेक्षक नेटफ्लिक्सवरच पाहू शकता.