बिग बॉस १८ : आता बिग बॉस १८ ची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे, सोशल मीडियावर स्पर्धकांच्या नावांचा पूर आला आहे. आता काही तासांमध्ये होस्ट सलमान खान सोबत बिग बॉस १८ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे बिग बॉस चाहते प्रचंड उत्सुक आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये जाणारे काही स्पर्धकांचे प्रोमो प्रदर्शित झाले आहेत. त्या स्पर्धकांचे चेहरे बिग बॉसने लपवले आहेत. परंतु तरीही बिग बॉसच्या चाहत्यांनी त्या स्पर्धकांना ओळखले आहेत. बिग बॉसच्या घरामधील यंदाची थीम फार मनोरंजक असणार आहे. असे म्हंटले जात आहे की, यावेळी स्पर्धकांचे भविष्य दिसणार आहे. त्याच्या बिग बॉसची आणखी एक खास गोष्ट म्हणजेच बिग बॉसचे आलिशान घर त्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक असतात. यंदाचे बिग बॉस १८ चे घर कसे असणार आहे यावर एकदा नजर टाका.
यंदाचे बिग बॉस १८ चे घर कसे असणार आहे यावर एकदा नजर टाका. फोटो सौजन्य - कलर्स युट्युब
बिग बॉसचे घर प्रत्येक सिझनला पाहण्यासारखे असते, ज्याप्रकारे सिझनची थीम असते त्याप्रकारे बिग बॉसचे घर सजवले जाते. फोटो सौजन्य - कलर्स युट्युब
व्हिडिओच्या सुरुवातीला व्हॉईसओव्हरमध्ये बिग बॉस म्हणतात की यावेळी घरात घड्याळ असेल, परंतु स्पर्धकांची वेळ कशी बदलेल हे बिग बॉस ठरवेल.
सोशल मीडियावर स्पर्धकांचे प्रोमो रिलीज झाल्यानंतर आता बिग बॉसच्या आतल्या भागाची एक सुंदर झलक दाखवण्यात आली आहे. फोटो सौजन्य - कलर्स युट्युब
घरात एक आरसा आहे, ज्याद्वारे बिग बॉस घरातील सदस्यांचे भविष्य दर्शवेल. बिग बॉसच्या इच्छेनुसार स्वयंपाकघरात रेशन येईल असे व्हिडिओमध्ये सांगितले आहे. फोटो सौजन्य - कलर्स युट्युब
बिग बॉसच्या घरात तुम्हाला घोड्यांसोबत हत्तीही पाहायला मिळणार आहे. घराची रचना पूर्णपणे बदलली आहे. यावेळी स्पर्धकांच्या समोर एक फोन असेल, पण त्याद्वारे ते घराबाहेरील जगाशी बोलू शकणार नाहीत. फोटो सौजन्य - कलर्स युट्युब
बिग बॉस १८ चा प्रीमियरच्या भागाचे शूटिंग झाले आहे, यावेळचा शूटिंगचा सलमान खानचा फोटो सोशल मीडियावर आला आहे.