प्रतीक बब्बरचा सावत्र भावासोबतचा वाद संपला ? आर्य बब्बरच्या फोटोने वेधले लक्ष...
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते राज बब्बरचे लग्न नादिरा झहीरसोबत १९७५ मध्ये पहिलं लग्न केले होते. त्यांना आर्य बब्बर आणि जुही बब्बर अशी दोन मुलं आहे. काही वर्षांनंतर राज यांचं स्मिता पाटील यांच्यावर प्रेम जडलं. ते काही दिवस लिव्ह-इनमध्येही राहिले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर राज आणि स्मिता यांना एक मुलगा झाला, ज्याचं नाव प्रतीक आहे. प्रतीकच्या जन्मावेळी स्मिता यांची तब्येत बिघडली होती. प्रतीकच्या जन्मानंतर केवळ 15 दिवसांनी स्मिता पाटील यांचे निधन झाले.
आता होणार फुल टू राडा; सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित…
अलीकडेच, प्रतीक आणि त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीचं लग्न झालं. त्यांच्या लग्न समारंभात वडील राज, सावत्र भाऊ आर्य आणि सावत्र बहीण जुही यांनी हजेरी लावली नव्हती. तेव्हापासून बब्बर कुटुंब चर्चेत आहे. यानंतर, प्रतीकने अधिकृतपणे त्याच्या वडिलांचे आडनाव काढून टाकले आणि आई स्मिता पाटीलचे नाव स्वीकारले. दरम्यान, आता आर्यने Sibbling Day च्या निमित्त भावा आणि बहिणीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रतीक आणि बब्बर कुटुंबात दुरावा आला आहे. त्याच दरम्यान, आता प्रतीकने Sibbling Dayचं निमित्त साधत आपल्या सावत्र भावासाठी आणि बहिणीसाठी खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. आर्य बब्बरने इन्स्टाग्रामवर जुही आणि प्रतीकसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोला कॅप्शनमध्ये लिहिलेय की, “अपने तो अपने होते है, उखाड लो जो उखाडना है…” Sibbling Day असं त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय.
प्रसिद्ध गायकाचं महात्मा गांधींविषयी धक्कादायक विधान, म्हणाले, “पाकिस्तानची निर्मिती त्यांनी केली…”
प्रतीक बब्बरने १४ फेब्रुवारी २०२५ रोजी गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीसोबत दुसरं लग्न केलं. या लग्नाला प्रिया बॅनर्जीच्या आणि स्मिता पाटीलच्या माहेरचे लोकं होते. प्रतीकने त्याच्या लग्नात आपल्या वडिलांना आणि आपल्या सावत्र भाऊ- बहिणीला बोलवलं नव्हतं. लग्नानंतर दिलेल्या एका मुलाखतीत प्रतीकने आपल्याला वडिलांसारखं व्हायचं नसून आईसारखं व्हायचंय, त्यामुळे नाव बदलल्याचं विधान केलं. इतकंच नाही तर बब्बर कुटुंबाशी ताणलेल्या संबंधांबद्दल योग्य वेळ आल्यावर बोलणार असल्याचंही तो म्हणाला होता.
गौरव खन्ना ठरला ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’चा विनर, या खास रेसिपीने संजीव कपूरही भारावले…