Zapuk Zupuk Marathi Movie Trailer Released
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या भरघोस यशानंतर जिओ स्टुडिओज निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपट येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी रिलीज होणार आहे. नुकतच या चित्रपटाचा धमाल ट्रेलर रितेश देशमुखच्या हस्ते रिलीज करण्यात आला. ट्रेलर सोशल मीडियावर रिलीझ होताच धुमाकूळ घालत आहे. विशेष म्हणजे अभिनेता रितेश देशमुखचा सूरज चव्हाण खूप मोठा चाहता आहे आणि आज बिग बॉस सीजन ५ च्या यशानंतर रितेश सूरजच्या या खास क्षणी सामील झाला आहे. दिग्दर्शक केदार शिंदे ह्यांनी बिग बॉस च्या वेळीच सूरज सोबत एक चित्रपट बनवण्याचं ठरवलं होतं आणि आता ते अंमलात आणून २५ एप्रिल रोजी फिल्म रिलीज ही होतेय.
प्रसिद्ध गायकाचं महात्मा गांधींविषयी धक्कादायक विधान, म्हणाले, “पाकिस्तानची निर्मिती त्यांनी केली…”
दरम्यान, ‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असून ह्या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांसाठी एक आनंदाची मेजवानी आहे. रोमान्स, ॲक्शन आणि ड्रामा अशा धाटणीचा असणारा चित्रपटाचा ट्रेलर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे तरुणांमध्ये या चित्रपटाची क्रेझ मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’हूक स्टेप्सने आणि हटके डायलॉग्सने पुन्हा एकदा अख्खा महाराष्ट्र गाजणार आहे. ट्रेलरमध्ये दोन कमाल गाण्यांची झलक सुद्धा पहायला मिळते. त्यातील एक गाणं नक्कीच ह्या पुढे हळद गाजवेल, ह्यात काही शंका नाही. त्याचसोबत सुरज आणि जुई भागवतची छान जोडी चाहत्यांना अजून आकर्षित करते. फॅमिली एंटरटेनमेंटचा जबरदस्त तडका असलेल्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाची टीम संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन करायला सज्ज आहे.
गौरव खन्ना ठरला ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’चा विनर, या खास रेसिपीने संजीव कपूरही भारावले…
ट्रेलर लाँचवेळी अभिनेता रितेश देशमुख ‘झापुक झुपूक’ चित्रपटाच्या प्रवासाबद्दल सांगितलं की, “बिग बॉसची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा माझा आणि सूरजसाठी तो पहिला प्रवास होता. केदार भाऊंसाठी सुद्धा तो पहिला प्रवास होता. सूरज जेव्हा बॉग बॉसच्या घरात तिसऱ्या आठवड्यात होता तेव्हाच केदार भाऊंनी सूरजवर चित्रपट बनवण्याचं ठरवलं होतं. त्यांनी त्यावेळी मला म्हटलं होतं की, विजेता कोण पण असू दे मी सूरजवर चित्रपट बनवणार आणि ह्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. असं नाही आहे की सूरज जिंकल्यावरच त्याचा चित्रपट बनवेल. त्यामुळे केदार भाऊंच्या हिम्मत आणि कमिटमेंटला माझा सलाम आहे. ह्या चित्रपटाचं संगीत, एडिटिंग आणि स्टोरी सगळंच अप्रतिम आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर आहे. सूरज आणि संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा..”
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक केदार शिंदेंनी सांगितलं की, “‘झापुक झुपूक’ची संकल्पना जेव्हा मला आली, त्यावेळेस बिग बॉस मराठी सुरु होतं. मी कलर्स मराठीचा प्रोग्रामिंग हेड असल्या कारणामुळे बिग बॉसची जबाबदारी माझ्यावर होती. त्यावेळी माझं आणि रितेशचं खूप बोलणं सुरु असायचं तेव्हाच मी ती कल्पना रितेशला सांगितली. रितेश भाऊंना ही कल्पना भयंकर आवडली आणि त्यांनी सुद्धा मला सांगितलं की जर माझ्याकडे उत्तम गोष्ट आहे तर मी ती पुढे आणावी. आज या ट्रेलरच्या माध्यमातून मी एक सुंदर गोष्ट प्रेक्षकांसमोर आणतोय आणि ह्या वेळेस सुद्धा रितेश भाऊ माझ्यासोबत उभे आहेत, ह्याचा मला आनंद आहे.”
‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूरज सोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे,पायल जाधव,दीपाली पानसरे, तसेच पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. प्रत्येकाला आपलीशी वाटणारी ही गोष्ट आहे. एका लव्हस्टोरी सोबतच वेगवेगळ्या भावनांचे मिश्रण चित्रपटात पाहायला मिळणार आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे आणि बेला केदार शिंदे, केदार शिंदे दिग्दर्शित “झापुक झुपूक” चित्रपट येत्या २५ एप्रिलला रिलीज होणार आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून आता चाहते चित्रपटाच्या रिलीझची आतुरतेने वाट पाहत आहे.