Shekhar Kapoor Emotional Video Viral
सोनी टिव्हीवरील प्रसिद्ध टेलिव्हिजन रिअॅलिटी शो असलेला ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया’ (Celebrity MasterChef India) हा शो गेल्या अनेक दिवसांपासून कमालीचा चर्चेत राहिला आहे. या शोमध्ये टिव्ही इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी सहभाग घेतला होता. आता त्यातीलच एका कलाकाराच्या हाती या शोची ट्रॉफी आली आहे. नुकताच या शोचा ग्रँड फिनाले पार पडला. ग्रँड फिनालेमध्ये, ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’च्या ट्रॉफीवर टिव्ही अभिनेता गौरव खन्नाने आपलं नाव कोरलं आहे. त्याने पहिल्या सीझनचा विनर होण्याचा मान पटकावला आहे.
‘सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया’मध्ये उषा नाडकर्णी, निक्की तांबोळी, अर्चना गौतम, तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना, राजीव अडातिया, फैजल शेख, अभिजीत सावंत, दीपिका कक्कर हे कलाकार या स्पर्धेत सहभागी झाले होते. यामधून अभिनेता गौरव खन्नाने ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. दरम्यान, गौरव खन्नाने ग्रँड फिनालेमध्ये फणसापासून खास पदार्थ आणि आइसक्रिम स्वीट डिश बनवून परिक्षकांना खूश करत ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’च्या ग्रँड फिनालेला फराह खान, विकास खन्ना, रणवीर ब्रार यांच्यासोबत प्रसिद्ध शेफ संजीव कपूरही उपस्थित होते. गौरव खन्नाने त्याच्या डिशने संजीव कपूर यांचंही मनं जिंकून घेतलं. गौरव खन्नाचं पाककौशल्य पाहून संजीव कपूरही आश्चर्यचकित झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी अभिनेत्याचं कौतुकही केलं.
राहायला 6BHK चा बंगला, फिरायला BMW कार, फराह खान पेक्षा तिच्या कूकचा थाट न्यारा; जाणून घ्या संपत्ती
दरम्यान, शोमध्ये गौरव खन्ना, तेजस्वी प्रकाश आणि निक्की तांबोळीसह टॉप 5 मध्ये राजीव अडातिया आणि फैजल शेखचा समावेश होता. फराह खान, संजीव कपूर आणि रणवीर ब्रार यांनी गौरव खन्ना यांना सेलिब्रिटी मास्टरशेफचा विजेता म्हणून घोषित केले. ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’चा विजेता ठरल्यानंतर गौरव खन्नाला परिक्षकांकडून बक्षीस म्हणून ट्रॉफीसह काही रोख रक्कम देण्यात आली. गौरवला ट्रॉफीसोबत २० लाख रुपये इतकी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे. ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये टॉप ३ मध्ये, गौरव खन्ना, निक्की तांबोळी आणि तेजस्वी प्रकाशचा समावेश झाला होता. निक्की तांबोळी उपविजेती असून तिसऱ्या स्थानावर तेजस्वी प्रकाश आहे. तर विजेता गौरव खन्ना होता. सेलिब्रिटी मास्टरशेफच्या ग्रँड फिनालेमध्ये गौरव खन्नाच्या कुटुंबातील कोणीही उपस्थित नसल्याने, कुमकुम मालिकेतील को- स्टार हुसेन कुवाजेरवाला गौरवला पाठिंबा देण्यासाठी पोहोचला होता.