प्रिती झिंटा भाजपामध्ये प्रवेश करणार ? चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिले थेट उत्तर
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा (Bollywood Actress Preity Zinta) हिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी प्रिती कायमच सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात असते. अभिनयापासून सध्या दूर असलेली प्रिती गेल्या काही दिवसांपासून आयपीएल सामान्यांमुळे चर्चेत आहे. प्रिती ‘पंजाब किंग’ टीमची मालकीण आहे. आयपीएल सामन्यांदरम्यान अभिनेत्री कायमच चर्चेत असते. अशातच गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यावर आता अभिनेत्रीनं उत्तर दिलं आहे.
Sitaare Zameen Par: चित्रपटाची ट्रेलर रिलीज डेट ढकलली पुढे, का घेतला अभिनेत्याने हा निर्णय?
प्रिती झिंटाने नुकतंच एक्सवर (ट्वीटर) Ask Me Anything नावाच्या सेशनमध्ये ‘PZchat’मध्ये आपल्या फॅन्ससोबत संवाद साधला. या सेशनमध्ये अभिनेत्रीने चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी सेशनदरम्यान प्रितीला एका चाहत्याने, “तुझे काही महिन्यांपूर्वीचं ट्विट पाहिलं असता, असं वाटतं की, तू भाजप पक्षात प्रवेश करणार आहेस?” असा प्रश्न विचारला होता. नेटकऱ्याच्या या प्रश्नावर प्रीतीनं थेट उत्तर दिलं आहे आणि तिच्या राजकारणातील प्रवेशाबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या चर्चांवर अखेर अभिनेत्रीने उत्तर दिले आहे.
प्रितीने तिच्या एक्स पोस्टमध्ये लिहिले की, “सोशल मीडियावरील लोकांची हीच समस्या आहे. आजकाल प्रत्येक जण खूपच निर्णयक्षम झाले आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे, मंदिरात किंवा महाकुंभात जाणं आणि मी कोण आहे किंवा माझ्या ओळखीचा अभिमान बाळगणं म्हणजे राजकारणात येणं असं होत नाही किंवा त्या कारणास्तव भाजपामध्ये सामील होणं असंही नाही. भारताबाहेर राहिल्यानं मला माझ्या मायदेशाचे खरं मूल्य कळलं आहे आणि इतरांप्रमाणे मी आता भारत आणि भारतीय असलेल्या सर्व गोष्टींना अधिक महत्त्व देते.” त्यामुळे आता प्रीतीच्या राजकारणातील प्रवेशाच्या सर्व चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. प्रीतीनं राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट करीत त्याबाबत स्वतः उत्तर दिलं आहे.
That’s the problem with people on social media, everybody has become so judgemental off late. As I said earlier, going to a temple / Maha Kumbh and being proud of who I am & my identity does not equate with me joining politics or for that reason BJP. Living outside India has made… https://t.co/34PBYMSC9F
— Preity G Zinta (@realpreityzinta) April 28, 2025
प्रितीने तिच्या एक्स पोस्टमध्ये, चाहत्यांची माफी मागत पुढे लिहिले की, “जर मी अचानक बोलले असेल तर मला माफ करा! या प्रश्नामुळे मला PTSD होते. तुमच्या स्पष्टीकरणाचा मी आदर करते. आई झाल्यानंतर आणि परदेशात राहिल्यानंतर मी माझ्या मुलांना ते अर्धे भारतीय आहेत, याची अनेकदा माहिती देत असते. ती भारतीय ही आहेत, याची त्यांना मी अनेकदा खात्री करून देते. माझा नवरा नास्तिक (agnostic) असल्याने आम्ही आमच्या मुलांना हिंदू म्हणून वाढवत आहोत. दुर्दैवाने, मला सतत टीकेचा सामना करावा लागत आहे आणि माझ्या निवडीचे नेहमीच राजकारण केले जात असल्याने हा साधा आनंद हिरावून घेतला जात आहे. मला वाटते की मी कोण आहे याबद्दल किंवा माझ्या मुलांना त्यांच्या धर्माबद्दल शिकवण्यात अभिमान आहे याबद्दल मला उत्तर देत राहावे लागेल. चला वेळेप्रमाणे पुढे जाण्याची वेळ आली आहे. तुम्हाला खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा पाठवत आहे.”
That’s the problem with people on social media, everybody has become so judgemental off late. As I said earlier, going to a temple / Maha Kumbh and being proud of who I am & my identity does not equate with me joining politics or for that reason BJP. Living outside India has made… https://t.co/34PBYMSC9F
— Preity G Zinta (@realpreityzinta) April 28, 2025
दरम्यान, जीन गुडइनफशी लग्न केल्यानंतर प्रीती लॉस एंजेलिसला गेली. या काळात तिनं अभिनयापासून ब्रेक घेतला होता. लवकरच ती अभिनेता सनी देओलबरोबर ‘लाहोर १९४७’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. त्यामुळे तिचे अनेक चाहते या चित्रपटाची वाट बघत आहेत.