
उर्फी जावेद (Urfi Javed) सध्या आपल्याला स्प्लिट्सविला शो पाहायला मिळत आहे. उर्फी नेहमीच तिच्या अतरंगी फॅशनमुळे आणि तिच्या आगळ्यावेगळ्या ड्रेसमुळे चर्चेत असते. उर्फीने भले मोठ्या डिझायनर्ससोबत काम केले असेल, पण आजही ती स्वत:चे कपडे डिझाइन करते. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. ज्यामध्ये उर्फीचा रेड कार्पेट लूक पाहून सगळेच थक्क झाले आहेत. अनेकदा उर्फी तिच्या बोल्ड स्टाईल आणि शॉर्ट कपड्यांमध्ये दिसणारी उर्फी बऱ्याच कमीवेळा पूर्ण कपड्यांमध्ये दिसते. बऱ्याच वेळा तर ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सुद्धा चर्चेत असते. उर्फी जावेद शनिवारी रेड कार्पेटवर दिसली. अहो, हे रेड कार्पेट स्वतः उर्फीचे होते, ज्यावर ती फक्त चालत होती. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्री हेवी ब्लू कलरच्या गाऊनमध्ये दिसत आहे. हा गाऊन घालून उर्फी टेम्पोमधून खाली उतरते आणि रेड कार्पेटवर मीडियासाठी पोज देताना दिसते.
उर्फी मीडियासमोर म्हणाली की, “मला रेड कार्पेटवर कोणीही बोलावत नाही. म्हणून मी स्वतःचा रेड कार्पेट तयार केला. मी माझ्या रेड कार्पेटवर सर्व काही स्वतः करेन, मला कोणी बोलावले किंवा आमंत्रित केले तरी मी माझे रेड कार्पेट स्वतःच करेन. तिच्या गाऊनचे वजन 90 ते 100 किलो आहे. ते तयार करण्यासाठी सुमारे 450 मीटर कापड वापरण्यात आले आणि संपूर्ण पोशाख तयार करण्यासाठी दोन-तीन महिने लागले. 10-11 जणांनी मिळून बनवले आहे.
चाहत्यांच्या प्रतिक्रिया
उर्फी पुन्हा एकदा युजर्सच्या निशाण्यावर आली आहे. एकाने ‘म्हैस गाडीत गेली’ अशी प्रतिक्रिया दिली. एकाने लिहिले, ‘गाडी चालक आला आहे, घरातील कचरा उचला’. दुसऱ्याने लिहिले- ‘हे टेंट हाउस आहे’.