नेटकऱ्यांची तोंडं केली बंद, अखेर युविका-प्रिन्स आपल्या परीसह दिसले एकत्र; पहिली Lohri केली साजरी
अभिनेता प्रिन्स नरुला आणि अभिनेत्री युविका चौधरी हे फेमस कपल छोट्या पडद्यावरील पॉवर कपलपैकी एक आहे. प्रिन्स नरुला आणि युविका हे नेहमीच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अलिकडेच या जोडप्याने पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे. ऑक्टोबर महिन्यात युविका चौधरीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. प्रिन्स आणि युविका लग्नाच्या सहा वर्षांनंतर आई-बाबा झाले आहेत. अनेकदा नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या सोशल मीडियावर जोर धरत असताना काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर प्रिन्स नरुला आणि युविकाने बाळासोबतचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
‘असंभव’ चित्रपटात मुक्ता बर्वेनंतर नव्या अभिनेत्रीची एन्ट्री, सचित पाटिलसोबत करणार पहिल्यांदाच काम!
फोटो शेअर करताना प्रिन्स नरुलाने “आमच्या फॅमिलीची पहिली लोरी…” असं कॅप्शन देत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये, युविकाने रेड आणि येलो कलरचा ड्रेस वेअर केलेला दिसत आहे. तर प्रिन्सने व्हाईट कलरचा कुर्ता आणि पायजमा वेअर केलेला दिसत आहे. दरम्यान, युविकाने आणि तिच्या लेकीने सेम टू सेम कपडे वेअर केलेले दिसत आहेत. पण, प्रिन्स आणि युविकाने आपल्या लेकीचा चेहरा अद्याप चाहत्यांना दाखवलेला नाही. लेकीच्या चेहऱ्याजवळ अभिनेत्याने रेड कलरचा हार्ट इमोजी वापरला आहे.
दरम्यान, ख्रिसमसच्या दिवशी प्रिन्स आणि युविकाने आपल्या लेकीचे नाव एकलिन असं ठेवले आहे. प्रिन्सचे आणि क्यूट लेकीचे फोटो शेअर करत त्यांनी आपल्या मुलीचं नाव जाहीर केलं होतं. प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी दोघेही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसाठी पोस्ट करत एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करत दिसतात. प्रिन्स आणि युविका दोघेही सध्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारत बाळाचं संगोपन करत आहेत आणि सोशल मीडियावर त्यांच्या मुलीच्या पोस्ट शेअर करत असतात. सध्या हे कपल त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.