Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paani Trailer : महाराष्ट्रातल्या पाणीटंचाईसाठी झगडणाऱ्या तरुणाची जीवनगाथा रुपेरी पडद्यावर दिसणार, ‘पाणी’चा ट्रेलर रिलीज

'पाणी' हा महाराष्ट्रातील पाणीटंचाईच्या भीषण परिस्थितीवर भाष्य करणारा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठवाड्यातील पाणीटंचाई सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणाची संघर्षगाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Oct 04, 2024 | 09:08 PM
महाराष्ट्रातल्या पाणीटंचाईसाठी झगडणाऱ्या तरुणाची जीवनगाथा रुपेरी पडद्यावर दिसणार, 'पाणी'चा ट्रेलर रिलीज

महाराष्ट्रातल्या पाणीटंचाईसाठी झगडणाऱ्या तरुणाची जीवनगाथा रुपेरी पडद्यावर दिसणार, 'पाणी'चा ट्रेलर रिलीज

Follow Us
Close
Follow Us:

राजश्री एंटरटेन्मेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्स, कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत ‘पाणी’ हा महाराष्ट्रातील पाणीटंचाईच्या भीषण परिस्थितीवर भाष्य करणारा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या टीझरवर प्रेक्षकांच्या कौतुकाचा वर्षाव होत असतानाच आता या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर झळकला आहे. मराठवाड्यातील पाणीटंचाई सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणाची संघर्षगाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

या ‘जलदूता’ची म्हणजेच हनुमंत केंद्रे यांची भूमिका आदिनाथ कोठारे याने साकारली असून या चित्रपटात रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे लिखित या चित्रपटाचे दिग्दर्शनही आदिनाथ कोठारे यानेच केले आहे. तर नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॅा. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते असून महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत.

हे देखील वाचा – मानसिक समस्यांवर भाष्य करणाऱ्या Zindaginama चा ट्रेलर रिलीज, वेबसीरीजमध्ये दिसणार आघाडीचे मराठी कलाकार

या चित्रपटात मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात हनुमंत केंद्रे यांचे इतिहास घडवणारे कार्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाणी प्रश्नांमुळे गावातील अनेक कुटुंबे गाव सोडून जात असतानाच या तरुणाने गावातच राहून या प्रश्नावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. गावात पाणी नसल्याने त्याचे लग्नही होत नसल्याचे ट्रेलरमध्ये दिसतेय. त्यामुळे आता गावात पाणी आणण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या या तरुणाचा हा प्रवास कसा असणार, गावात पाणी येणार का? ज्या तरुणीवर त्याचे प्रेम आहे तिच्याशीच लग्न होणार का ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला १८ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात मिळणार आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शक आदिनाथ कोठारे म्हणतो, ” हा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. माझ्या या प्रवासाचा भाग असलेल्या प्रत्येकाचा मी आभारी आहे. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता हे तिहेरी भूमिका साकारणे आव्हानात्मक होते परंतु या सगळ्याची प्रोसेस कमाल होती. खूप काही शिकवणारी होती. मला विश्वास आहे की, प्रेक्षकांना हा चित्रपट आवडेल. ‘पाणी’च्या माध्यमातून, आम्ही काही लोकांमध्ये पाणी टंचाईबद्दल जागरूकता निर्माण करण्यात यशस्वी झालो, तरी आम्हाला त्याचा आनंद होईल. आमच्या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकला आपला आवाज देणारे गायक शंकर महादेवन आणि चित्रपटाला सहाय्य करणाऱ्या आमिर खान प्रॉडक्शन्सचेही आम्ही कायम आभारी आहोत.’’

चित्रपटाबद्दल पर्पल पेबल पिक्चर्सची संस्थापक आणि प्रवर्तक प्रियांका चोप्रा जोनस म्हणते, ” हा एक असा सामाजिक विषय आहे, तो जगभरात पोहोचणे, अतिशय महत्वाचे आहे आणि असा विषय घेऊन आम्ही येतोय, याचा विशेष आनंद आहे. अनोख्या आणि प्रादेशिक भाषेतील चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. ‘पाणी’ हा त्यातीलच चित्रपट आहे. खूप चांगल्या पद्धतीने या चित्रपटाची रचना करण्यात आली आहे. या चित्रपटाची टीमही उत्कृष्ट आहे. ‘पाणी’साठी प्रेक्षक जेवढे उत्सुक आहेत, तितकीच मी सुद्धा आहे.”

राजश्री एंटरटेन्मेंटच्या नेहा बडजात्या म्हणतात, ” हा आमचा पहिला मराठी चित्रपट आहे आणि या इंडस्ट्रीत आमचा पहिला ठसा उमटवण्यासाठी ‘पाणी’ यापेक्षा आणखी चांगला चित्रपट कोणता आहे? पर्पल पेबल पिक्चर्स, कोठारे व्हिजन यांसारख्या नावाजलेल्यासोबत एकत्र येऊन काम करणे, माझ्यासाठी एक मोठी संधीच आहे. चित्रपटाची कथा, बांधणी, कलाकार आणि इतर तंत्रज्ञ या सगळ्याच गोष्टींचा ताळमेळ उत्तमरित्या जुळून आल्याने पदार्पणातच एक उत्तम कलाकृती घेऊन येत असल्याचे समाधान आहे.”

हे देखील वाचा – पाच स्पर्धक अन् एक विजेता, कोणाच्या नावावर होणार Bigg Boss Marathi 5 ची रत्नजडीत ट्रॉफी

Web Title: Priyanka chopra jonas produce and addinath kothare starrer paani marathi movie trailer out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 09:08 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.