
rranbir kapoor
सोमवारची सुरुवात आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या सर्व चाहत्यांसाठी एक विलक्षण बातमीने झाली. आलियाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर ती प्रेगंनन्ट असल्याची बातमी शेअर केली. या बातमीनंतर त्यांच्या फॅन्ससह बॅलिवूड सेलेब्रिटीही अजूनही अवाक आहेत. ज्या क्षणी या दोघांनी ही खास घोषणा केली आहे, त्या क्षणापासून सोशल मीडियावर अभिनंदनाच्या संदेश येत आहे. प्रियांका चोप्रा, टायगर श्रॉफ, इशान खट्टरपासून ते करण जोहरपर्यंत सर्वांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
[read_also content=”गुवाहाटीत असलेल्या बंडखोर आमदारांच्या खर्चाची ईडी चौकशी करा, राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा https://www.navarashtra.com/maharashtra/rashtrawadi-congress-demand-ed-inquriy-of-expenditure-done-in-gowahati-by-mlas-nrsr-297542.html”]
रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी हिने टिप्पण्या विभागात हार्ट इमोजी आणि किसिंग स्मायली इमोजी पोस्ट केल्या आहेत. मौनी रॉयने अनेक हृदय इमोजीसह ‘अतिशय आनंदी’ लिहिले. रकुल प्रीत सिंहने लिहिले, ‘ अभिनंदन’. आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी लिहिले, ‘अभिनंदन मामा आणि पापा सिंह’. करण जोहरने लिहिले की, ‘खूप आंनद होतोय’ इशान खट्टर आणि टायगर श्रॉफ यांनीही अभिनंदनाचे संदेश पोस्ट केले. प्रियंका चोप्रानेही लिहिले, ‘अभिनंदन हनी! आता प्रतीक्षा करू शकत नाही’