प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि रिचर्ड मॅडन (richard madden ) यांची साय-फाय गुप्तहेर सिटाडेल वेबसिरिज (Citadel Review) शुक्रवारी, 28 एप्रिलला OTT प्लॅटफॉर्म ॲमेझान प्राईमवर (Amazon Prime Video) वर रिलीज झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून देसी गर्ल प्रियंकाच्या या स्पाय थ्रिलर मालिकेची जोरदार चर्चा होत होती. या मालिकेच्या ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता मालिकेचे दोन भाग प्रदर्शित करण्यात आले त्यात काय खास पाहायला मिळालंय बघुया.
सिटाडेलही कथा एका गुप्तचर संस्थेभोवती फिरते. ज्याचे हेर जगभरात पसरलेले आहेत. मॅंटीकोरचे या संस्थेचे लोक सिटाडेलला उद्धवस्त करण्यात यशस्वी होतात. यावेळी या सस्थेचे एजेंट नादिया सिंग (प्रियांका चोप्रा जोनास) आणि मेसन (रिचर्ड मॅडन) यांच्यावर ट्रेनमध्ये हल्ला होतो, जिथे त्यांना मारण्याचा प्रयत्न केला जातो. या हल्ल्यतुन ते दोघही वाचतात मात्र, काही कारणामुळे त्यांच्या स्मतीभ्रंश होतो. त्यानंतर, नादिया आणि मेसन दोघेही सामान्य आयुष्य जगू लागतात. सुमारे 8 वर्षांनंतर, बर्नार्ड (स्टॅनली टुसी) हा मेसनच्या आयुष्यात प्रवेश करतो, जो त्याला सांगतो की तो कोण आहे. मग मेसन नादियाला शोधण्यासाठी आणि मॅन्टीकोरच्याला उद्धवस्त करण्यासाठी तो दोघांना पुन्हा सिटाडेलमध्ये काम करण्यास सांगतो. सिटाडेलला वाचवण्यासाठी आणि मॅन्टीकोरला थांबवण्यासाठी नादिया-मेसन यांना काय काय आव्हानांना तोंड द्यावं लागंत आणि ते या मिशनमध्ये यशस्वी होतात का? हे पाहण्यासाठी तुम्हाला सिटाडेल पाहावी लागेल.
प्रियांकाने साकारलेल्या गुप्तहेर तिने तिच्या अभिनयातुन अचुक हेरला आहे तर, यापुर्वीही चित्रपटातुन ॲक्शन सिन करणाऱ्या प्रियंकाने सिटाडेलमध्ये 80% ॲक्शन सीन स्वता केलेले आहेत.तिने केलेल्या अनेक धक्कादायक स्टंट सीन्स मधुन तिची मेहनत स्पष्टपणे दिसते.
रिचर्ड मॅडेनने साकारलेला एजंटही अभिनयातुन मन जिंकण्यात यशस्वी झाला आहे. मिशनवर काम करणार एक एजंट त्याने उत्तम साकारला आहे. ऑर्लिकच्या भूमिकेत स्टॅनले टुसीने तंत्रज्ञान तज्ञ म्हणून उत्तम काम केले आहे. त्याच त्याच्या जमेची बाजु म्हणजे त्याचं कॉमिक टायमिंग, संथ आणि गंभीर असलेल्या कथेत त्यांचे विनोद प्रेक्षकांना आवडतात. त्यात प्रियांका आणि रिचर्ड यांनी त्यांच्या केमिस्ट्रीने अक्षरश लोकांना खिळवुन ठेवण्यात यशस्वी झाली आहे. तर, ब्रिटीश राजदूत डालिया एशर म्हणून लेस्ली मॅनव्हिल मॅन्टिकोरने जोरदार कामगिरी केली.
एकंदरीत सिटाडेलला प्रियांका चोप्रा जोनासचा आजपर्यंतचा सर्वोत्कृष्ट हॉलीवूडपट म्हटल्या जाऊ शकतो, जिथे ती तिच्या मेहनतीच चिज होताना दिसत आहे. प्रियांका ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे आणि आता सिटाडेलमधून तिच्या अभिनयाचा डंका जागतिक स्तरावर वाजणार आहे. मालिकेत अॅक्शन करताना प्रियांका सॉलिड दिसत आहे. अभिनयाव्यतिरिक्त दिग्दर्शनाबद्दल बोलायचे झाले तर, न्यूटन थॉमस सिगलने या मालिकेच्या पहिल्या दोन भागांचे दिग्दर्शन केले आहे आणि त्याचे काम अप्रतिम आहे.
Amazon प्राइम व्हिडिओच्या सिटाडेल या मालिकेत एकूण 6 भाग आहेत, त्यापैकी 2 भाग 28 एप्रिल रोजी रिलीज झाले आहेत. या मालिकेत चांगला सस्पेन्स आणि ॲक्शन आहे, जी एक उत्तम कथानक घेऊन पुढे जाते. जर तुम्ही स्पाय थ्रिलर आणि ॲक्शन कंटेंटचे चाहते असाल तर तुम्ही ही मालिका जरूर पहा.