अरे बापरे... प्रसिद्ध गायकाला ओळखणंही झालं कठीण; रक्ताने अन् धुळीनं माखलेला लूक व्हायरल
प्रसिद्ध पंजाबी गायक आणि सुपरस्टार म्हणून दिलजीत दोसांझची आपल्या चाहत्यांमध्ये ओळख आहे. त्याने आपल्या गाण्याच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये ओळख प्रस्थापित केली तर आहे, शिवाय त्याच्या अभिनयानेही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. गेल्या काही दिवसांपासून गायक आणि सुपरस्टार दिलजीत दोसांझ त्याच्या ‘दिल लुमिनाटी’ या टूर शोमुळे चांगलाच चर्चेत आहे. दिलजीत त्याच्या म्युझिकल टूरसाठी देशातल्या महत्वाच्या शहरांमध्ये फिरत आहे. यानिमित्त त्याचे भारतात अनेक ठिकाणी कॉन्सर्ट आयोजित करण्यात येत आहेत. कायमच गाण्यामुळे चर्चेत राहणारा दिलजीत सध्या त्याच्या अपकमिंग चित्रपटामुळे चर्चेत आल्याची चर्चा आहे.
काही तासांपूर्वीच दिलजीत दोसांझने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्याचा तो फोटो पाहून नक्की हा दिलजीत दोसांझच आहे का ? असा प्रश्न नक्की पडेलच… रक्ताने माखलेला चेहरा आणि धुळीने माखलेले कपडे पाहून आपल्याला हा दिलजीत नक्की आहे की नाही याचा प्रश्न पडतो. कायमच आपल्या गाण्यामुळे चर्चेत राहणारा दिलजीत सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोतील अभिनेत्याची अवस्था पाहून चाहते हैराण झाले आहेत. त्याला काय झाले आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. मात्र हे फोटो दिलजीतच्या आगामी चित्रपटातील दृश्ये आहेत.
अभिनेत्याने शेअर केलेला फोटो पाहून, काही रोमांचक कथा तयार होत आहे, जी लवकरच प्रेक्षकांसमोर येईल, असा अंदाज लावला आहे. फोटो शेअर करताना दिलजीतने कॅप्शन दिले की, ‘मी अंधाराला आव्हान देतो…’ दिलजीतने शेअर केलेला हा फोटो ‘जसवंत सिंग खलरा’ यांच्यावरील बायोपिक मधला आहे. अभिनेत्याच्या ह्या अपकमिंग चित्रपटाचं नाव ‘पंजाब ९५’ असं आहे. पंजाबचे मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंग खलरा हे १९९५ मध्ये अचानक गायब झाले. त्यानंतर आजपर्यंत त्यांच्याबद्दल कोणतीही बातमी आलेली नाही. त्यांच्या बायोपिकची घोषणा २०२३ मध्येच करण्यात आली होती. त्या चित्रपटात दिलजीत सिंग दोसांझ प्रमुख भूमिकेत होता. दिलजीतने शेअर केलेला फोटो पाहता चित्रपटाच्या सेटवरील फोटो असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अद्याप या बायोपिकबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती दिलजीतने दिलेली नाही. पण हा शेअर केलेला फोटो पाहून अभिनेता लवकरच येत्या काही दिवसांत चित्रपटाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
जसवंत सिंग खलरा कोण होते?
जसवंत सिंग खलरा हे पंजाबमधील अमृतसर येथील बँकेचे संचालक होते. शिवाय, जसवंत सिंग हे एक धाडसी मानवाधिकार कार्यकर्ते होते, ज्यांनी पंजाबमधील बंडखोरीदरम्यान हजारो शीख तरुणांच्या कथित न्यायबाह्य हत्यांचा पर्दाफाश केला. जसवंत यांनी एका तपासाचे नेतृत्व केले होते. त्या काळात पंजाब पोलिसांनी कोणतीही नोंद न ठेवता २५००० हून अधिक शिखांचे अपहरण केले, त्यांची हत्या केली आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यानंतर त्यांचा मृत्यू कसा झाला. जसवंत यांच्या मृत्यूचे रहस्य आजतागायत उलगडलेले नाही. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने ‘पंजाब 95’च्या निर्मात्यांना चित्रपटात 120 कट करण्याचे निर्देश दिले आहेत. चित्रपटाचे निर्माते रॉनी स्क्रूवाला, अभिषेक चौबे आणि हनी त्रेहान आहेत. या चित्रपटात दिलजीत मुख्य भूमिकेत आहे. हानी तेहरान या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात दिलजीत दोसांझसोबत अर्जुन रामपाल आणि जगजीत संधू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.