अभिनेता आर माधवनचा जन्म 1 जून 1970 रोजी जमशेदपूर येथे झाला. फार कमी लोकांना माहीत असेल की चित्रपटात येण्यापूर्वी माधवनला आर्मीमध्ये जॉईन व्हायचं होतं पण नशिबाला वेगळंच मान्य होतं आणि तो अभिनेता बनला. चित्रपटात येण्यापूर्वी माधवन एका ठिकाणी शिक्षकाचं काम करत होता.
माधवन आणि सरिताची प्रेमकहाणीही चित्रपटापेक्षा कमी मनोरंजक नाही. सरिता ही त्याची विद्यार्थिनी होती आणि त्याच्या आयुष्यातील ती डेटिंगवर नेणारी पहिली मुलगी होती. गेले २५ वर्ष या दोघांचा संसार सुखाने सुरू आहे. मात्र त्यांच्या या लव्ह स्टोरीला नक्की कशी सुरूवात झाली जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
कशी झाली पहिली भेट
1999 मध्ये माधवनने सरिता बिर्जेसोबत लग्न केले. मात्र दोघांची पहिली भेट महाराष्ट्रातील कोल्हापूर या भागात झाली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर माधवनने कम्युनिकेश अँड पब्लिक स्पिकिंग क्लास घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांची सरिताशी भेट झाली. माधवनच्या शिकवणीमुळे क्लासेस संपल्यावर सरिताला एअर होस्टेसची नोकरी लागली, म्हणून सरिताला त्याचे आभार मानायचे होते. त्यामुळे तिने त्याला बाहेर जेवायला येमार का विचारले आणि या भेटीचे रूपांतर नंतर मैत्रीत झाले.
[read_also content=”मलायका अरोरा – अर्जुन कपूर ब्रेकअप? https://www.navarashtra.com/movies/malaika-arora-arjun-kapoor-breakup-in-a-dignified-way-540810.html”][read_also content=”मलायका अरोरा – अर्जुन कपूर ब्रेकअप? https://www.navarashtra.com/entertainment/malaika-arora-arjun-kapoor-breakup-in-a-dignified-way-540810.html”]
काय म्हणाला माधवन
एका मुलाखतीत माधवनने सांगितले होते की, ‘सरिता माझी विद्यार्थिनी होती. एके दिवशी त्याने मला बाहेर जेवायला बोलावले होते. मी एक सावळा मुलगा होतो म्हणून मला वाटले की ही माझ्यासाठी एक उत्तम संधी आहे. हळूहळू आमची मैत्री झाली आणि आम्हाला दोघांचा एकमेकांचा सहवास चांगला वाटू लागला. बरेच वर्ष डेटिंग केल्यानंतर माधवन आणि सरिता यांनी लग्न केले.
असे उजळले माधवनचे नशीब
1996 मध्ये माधवनने आपला पोर्टफोलिओ एका मॉडेलिंग एजन्सीकडे पाठवला. इथून त्याला जाहिरातीच्या ऑफर्स मिळू लागल्या. माधवनला चित्रपट मिळविण्यासाठी फार कष्ट करावे लागले नाहीत. त्याचे एकामागून एक चित्रपट हिट झाले आणि काही वेळातच तो सुपरस्टार बनला. माधवनला ‘रेहना है तेरे दिल में’ मधून बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. यानंतर ‘रंग दे बसंती’, ‘3 इडियट्स’ आणि ‘तनु वेड्स मनू’ यांसारख्या चित्रपटातील त्यांचे काम खूप आवडले.
[read_also content=”तिकळी नवी रहस्यमय मालिका, पूजा ठोंबरेची प्रमुख भूमिका https://www.navarashtra.com/movies/actress-pooja-thombre-and-vaishnavi-kalyankar-new-mystery-marathi-serial-tikali-on-sun-marathi-540923.html”]
25 वर्षांचा सुखाचा संसार
माधवन आणि सरिताने एकमेकांच्या साथीने 25 वर्षांचा सुखाचा संसार केलाय. त्यांना वेदांत नावाचा मुलगा असून इंटरनॅशनल लेव्हलला स्विमर म्हणून त्याने ओळख मिळवली आहे. तर आता अनेक ठिकाणी वेदांचे वडील म्हणून माधवनला ओळख मिळत आहे. माधवन अनेक विषयांमध्ये पारंगत असून तो एक अत्यंत हुशार आणि अभ्यासू म्हणूनही ओळखला जातो.