"ही मुलगी माझी कशी असू शकते..." ४७ % मिळवणाऱ्या अभिनेत्याच्या लेकीला बोर्डात मिळाले ९७ %
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेते राम कपूर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. राम कपूर यांनी त्यांच्या ‘बडे अच्छे लगतें है’ या मालिकेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर ते चर्चेत आले आहेत. त्यामुळे अभिनेत्यावर टीका सुद्धा झाली. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारे राम कपूर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या गडगंज संपत्तीमुळे चर्चेत आहेत. याशिवाय सध्या अभिनेता त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहेत.
झी मराठीच्या ‘या’ मालिकेत विद्या बालनची एन्ट्री, अभिनेत्रीने मालिकेतल्या नायिकेला दिले मोलाचे सल्ले…
राम कपूर आणि त्यांची मराठमोळी पत्नी अभिनेत्री गौतमी हे दोघंही गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. राम कपूर आणि गौतमी त्यांना एक मुलगा आणि मुलगी असे दोन अपत्य आहेत. त्यांच्या मुलीचं नाव सिया कपूर असून मुलाचं नाव अक्ष कपूर असं आहे. राम कपूर यांची मुलगी सिया कपूर सध्या चर्चेत आहे. दिग्दर्शिका आणि डान्स कॉरियोग्राफर फराह खान नुकतीच राम कपूर यांच्या घरी गेली होती. त्यावेळी तिने तिथे ब्लॉग शूट केला होता. या ब्लॉगमध्ये अभिनेत्याने त्यांच्या लेकीबद्दल एक महत्त्वाची माहिती दिली होती.
मृत्यूच्या दिवशी तिने फ्रिजमधलं खाल्ल अन्न…; शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं खरं कारण आलं समोर!
सियाने नुकतंच ICSE बोर्डाच्या परिक्षेमध्ये तब्बल ९७ % गुण मिळवले आहेत. आता ती न्यूयॉर्क विद्यापीठानंतर कोलंबिया विद्यापीठात पुढचं शिक्षण शिकायला जाणार आहे. फराहच्या ब्लॉगमध्ये अभिनेता सहज गंमतीत म्हणाला की, “मला तर फक्त ४७ % गुण मिळाले होते. ही माझी मुलगी कशी असू शकते?” व्हिडिओमध्ये फराह राम कपूरला तिच्या मजेशीर शैलीत म्हणते की, “तु काय खाऊन हिला जन्म दिलाय ?” सिया आणि तिचा भाऊ अक्ष हे दोघेही फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहेत. राम आणि गौतमी केव्हातरी माध्यमांसोबत आपल्या मुलांबद्दल रंजक आणि अभिमान वाटाव्या अशाच गोष्टी शेअर करत असतात, त्यामुळे ते केव्हातरी प्रकाशझोतात येतात.
सोनाक्षी सिन्हा पापाराझींवर चांगलीच संतापली, म्हणाली ‘आता वेळ आली आहे…’
गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेते राम कपूर यांची पत्नी गौतमी कपूर यांनी सांगितलं होतं की, सियाने तब्बल ३८ किलो वजन घटवलं. त्यावेळी सिया कमालीची चर्चेत आली होती. मुलीचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून अभिनेत्यालाही प्रेरणा मिळाली होती आणि तेव्हापासूनच त्याचाही वजन कमी करण्याचा प्रवास सुरू झाला होता. हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत गौतमीने सांगितलं होतं की, “वजन घटवण्यासाठी खरंतर रामला सियाने प्रेरणा दिली आहे. सर्वात आधी सियाने तिचं वजन कमी करण्यासाठी सुरुवात केली होती. तिला प्रेरित होऊन रामनेही वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. दृढ निश्चयामुळे काहीही शक्य होऊ शकतं हे सियाच्या प्रवासातून रामने पाहिलं.”