Shefali jariwala death She eat refrigerated food and bloods pressure drop
‘काँटा लगा’ गाण्यातून प्रसिद्धी झोतात आलेल्या शेफाली जरीवालाचा ४२ व्या वर्षी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री (२८ जून) अचानक अभिनेत्रीची तब्येत बिघडल्यामुळे तिला तात्काळ अंधेरीतील बेली व्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी शेफालीला मृत घोषित केलं. अभिनेत्रीच्या निधनाच्या वृत्ताने कुटुंबीय, मित्र मंडळींसह अख्ख्या फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. सध्या पोलिस अभिनेत्रीच्या मृत्यूचे गुढ उकलण्याच्या प्रयत्नात आहेत. पोलिस तपासात आता काही नवीन गोष्टी समोर आल्या आहेत.
सोनाक्षी सिन्हा पापाराझींवर चांगलीच संतापली, म्हणाली ‘आता वेळ आली आहे…’
पोलिस तपासात शेफालीच्या मृत्यूचं नवीन गुढ उकललं आहे. तपासात जी माहिती समोर आली आहे ती धक्कादायक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेफालीने शुक्रवारी तिच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती आणि त्या दिवशी तिने उपवास ठेवला होता. पूजा झाल्यानंतर तिने फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न खाल्ले. त्यानंतर ती दुपारी झोपली. संध्याकाळी शेफाली झोपेतून उठली तेव्हा तिचा रक्तदाब कमी झाला होता. यानंतर तिची अचानक तब्येत बिघडू लागली. तब्येत खालावल्यामुळे शेफालीने सलाईन घेतले. परंतु यानंतरही तिची प्रकृती बिघडू लागली. काहीवेळाने अचानक शेफालीचा रक्तदाब वाढला. त्यानंतर घरून शेफालीच्या आई- वडिलांना फोन करण्यात आला आणि त्यांनी सांगितले की, शेफाली बेशुद्ध पडली आहे. यानंतर शेफालीला बेली व्ह्यू रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिला दाखल करण्यापूर्वी मृत घोषित करण्यात आले.
करीना कपूरच्या मनात अजूनही ‘ती’ भिती कायम; म्हणाली, “मुलांनी ती घटना इतक्या लहान वयात…”
शेफालीच्या पार्थिवाचे शवविच्छेदन कूपर रुग्णालयात करण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, संपूर्ण शवविच्छेदन प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, ५ डॉक्टरांची टीम शवविच्छेदन अहवाल तयार करत आहे. त्याचा प्रारंभिक अहवाल आज (३० जून) येण्याची अपेक्षा आहे. शेफालीचे पती पराग त्यागीने शेफालीला बेशुद्ध अवस्थेत पाहताच, त्याने तिला ताबडतोब रुग्णालयात नेले, परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच शेफालीने अखेरचा श्वास घेतला होता. डॉक्टरांनी तिला रुग्णालयात पोहचताच मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक टीम शेफालीच्या घरीही चौकशीसाठी गेली होती. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “या तपासणीदरम्यान, डॉक्टरांना संशय आहे की अभिनेत्रीच्या मृत्यूचे कारण कमी रक्तदाब असू शकतो.”
पोलिसांनी आतापर्यंत १४ जणांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये तिचे कुटुंबीय, घरात काम करणारे लोक आणि शेफालीला भेटणारे जवळचे मित्र यांचाही समावेश आहे. यामुळे पोलिसांना तिच्या शेवटच्या दिवसाची संपूर्ण माहिती मिळण्यास मदत होईल. अहवालात असेही म्हटले आहे की पोलिसांनी शेफाली आणि तिचे कुटुंबीय ज्या मेडिकल स्टोअरमधून औषधे खरेदी करायचे त्या मेडिकल स्टोअरच्या फार्मासिस्टचा जबाब देखील नोंदवला आहे. त्यासोबतच, शेफालीच्या घरी कोण कोण आले होते हे शोधण्यासाठी पोलिस त्यांच्या इमारतीभोवती असलेल्या ७ सीसीटीव्ही फुटेजची देखील तपासणी करत आहेत.