Bollywood Actress Vidya Balan Entry In Zee Marathi Kamali Serial Watch Video
अलीकडच्या काळामध्ये झी मराठीवरील मालिकांचा चाहतावर्ग वाढत आहे. त्यामुळे चॅनलकडून प्रेक्षकांसाठी उत्कंठावर्धक ट्वीस्ट आणत प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरताना दिसत आहे. आजपासून (३० जून) झी मराठीवर ‘कमळी’ नावाची नवी कोरी मालिका सुरु होत आहे. खेडेगावात राहणारी, अभ्यासात प्रचंड हुशार आणि मुंबईत जाऊन उच्चशिक्षण घ्यायचं असं स्वप्न पाहणारी ‘कमळी’ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज होत आहे. मालिकेमध्ये ‘कमळी’ची भूमिका अभिनेत्री विजया बाबर प्रमुख भूमिका साकारत आहे. सध्या ह्या मालिकेमध्ये एक नवं गिफ्ट चाहत्यांना मिळणार आहे. मालिकेमध्ये एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.
मृत्यूच्या दिवशी तिने फ्रिजमधलं खाल्ल अन्न…; शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं खरं कारण आलं समोर!
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ‘कमळी’ची शिक्षका होऊन मालिकेत एन्ट्री घेतेय. विद्या बालन मालिकेमध्ये शिक्षिकेचा रोल साकारत असलेली पाहून चाहते अवाक झाले आहेत. अभिनेत्री विद्या बालन हिचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झी मराठीने काही तासांपूर्वीच हा प्रोमो शेअर केलेला आहे. प्रोमोमध्ये विद्या कमळीला काही प्रश्न विचारताना दिसते, “देशाची आर्थिक राजधानी कोणती?” यावर कमळी “मुंबई” असं उत्तर देते. यानंतर विद्या कमळीला “मुंबईतील विमानतळाचं नाव काय?” असा दुसरा प्रश्न विचारते. यावर कमळी “छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ” असं उत्तर देते.
सोनाक्षी सिन्हा पापाराझींवर चांगलीच संतापली, म्हणाली ‘आता वेळ आली आहे…’
‘कमळी’ने पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरं बरोबर दिल्यामुळे विद्या तिला तिसरा प्रश्न काहीसा हटके विचारते, “दादरवरून डोंबिवलीला जाण्यासाठी तू कोणती ट्रेन पकडशील?” या प्रश्नाचं उत्तर देताना कमळी गोंधळली आणि म्हणाली, “मॅडम मुंबईच्या ट्रेनचा खूप भुल-भुलैय्या असतोय बघा…” ‘कमळी’चं उत्तर ऐकून विद्या तिला म्हणते, “म्हणजे आता छडी लागे छम छम…” यानंतर दोघेही विजया आणि विद्या डान्स करताना दिसतात. व्हिडिओच्या शेवटी विद्याने कमळीला मुंबई शहरामध्ये नव्याने येणाऱ्या मुलीला काही मोलाचे सल्ले दिले आहेत.
करीना कपूरच्या मनात अजूनही ‘ती’ भिती कायम; म्हणाली, “मुलांनी ती घटना इतक्या लहान वयात…”
प्रोमोच्या शेवटच्या भागात, विद्या बालन उच्च शिक्षणासाठी मुंबईत येणाऱ्या ‘कमळी’ला तीन महत्त्वाचे सल्ले देणार आहे. अभिनेत्री म्हणते, “पहिलं गोष्ट म्हणजे वडापाव खाताना लाजायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जीभेवर मराठी भाषेचा गोडवा जपायचा आणि तिसरी गोष्ट म्हणजे मनात छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर सदैव ठेवायचा…” सध्या नेटकऱ्यांमध्ये विद्या बालनचा शिक्षिकेचा लूक चाहत्यांमध्ये कमालीचा चर्चेत आला आहे. हातात छडी, डोळ्याला चष्मा हा अभिनेत्रीचा हटके लूक सर्वांच्या पसंतीस उतरला आहे.