Ramshej – मराठी सिनेसृष्टीत ऐतिहासिक सिनेमांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले असताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधून ‘रामशेज’ या नव्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार आहे. चित्रपटात अभिनेता अंकित मोहन (ankittmohan) प्रमुख भूमिकेत असून हरीश दुधाडे (harish dhudadhe) प्राजक्ता गायकवाड (prajakta gaikwad) यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. (historical movie)
काय आहे या किल्ल्याचे महत्व-
रामशेज किल्ला हा महाराष्ट्रातील नाशिक-पेठ मार्गावर आहे. नाशिकपासून साडे चौदा किलोमीटर अंतरावर असलेला हा छोटासा प्राचीन किल्ला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मावळ्यांनी मुघलांशी तब्बल साडेपाच वर्ष झुंज दिली. मुघलांच्या 50 हजार सैन्यांशी फक्त 600 मावळ्यांनी लढत दिली होती. रामशेज आणि त्यांचा शूर किल्लेदार मुघलांना तब्बल साडेपाच वर्ष पुरुन उरला. या सूर्याजी जाधव किल्लेदाराचा शंभुराजांनी रन्नजडीत सोन्याचे कडे देऊन सत्कार केल्याची इतिहासात नोंद आहे.
[read_also content=”दमदार ॲक्शन आणि डायलॉग्सचा तडका, न्याय आणि अन्यायाची लढाई दाखवणारा ‘आदिपुरुष’चा दुसरा ट्रेलर ठरतोय लक्षवेधी https://www.navarashtra.com/entertainment/adipurush-second-trailer-launched-today-nrsr-411989/”]
‘रामशेज’ चा अर्थ
रामशेज हा एक हिंदी शब्द आहे जो भगवान रामाच्या पलंगाला सूचित करतो. प्रभू राम वनवासात असताना येथे काही काळ वास्तव्य केलं होतं. त्यामुळे, या किल्ल्याला हे नाव पडले. इंग्रजांनी १८१८ मध्ये एकूण 17 किल्ल्यांचा ताबा घेतला, त्यात रामशेज किल्ल्याचा समावेश होता. हा संपूर्ण इतिहास आता प्रेक्षकांना पडद्यावर पाहता येणार आहे.