रणबीर- साई पल्लवीच्या 'रामायण' चित्रपटाचा प्रोमो केव्हा रिलीज होणार? किती मिनिटांचा असणार प्रोमो व्हिडिओ
सध्या अवघ्या बॉलिवूडमध्ये रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाची शुटिंग सुरु आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांची फौज दिसणार आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित, ‘रामायण’ चित्रपटामध्ये रणबीर कपूर प्रभू श्री रामाच्या भूमिकेत तर, साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. प्रेक्षक सध्या या चित्रपटासाठी आतुर असून या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. ती गुड न्यूज म्हणजे चित्रपटाच्या प्रोमोसंबंधित…
ड्रग्ज खरेदी आरोपाखाली ‘या’ प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याला अटक, नेमकं काय प्रकरण?
रणबीर कपूरने आजवर अनेक चित्रपटांमध्ये ॲक्शन आणि कॉमेडी भूमिका साकारल्या आहेत. पहिल्यांदाच तो एक आध्यात्म भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रभू श्री रामाच्या भूमिकेमध्ये पहिल्यांदाच रणबीर कपूर दिसणार आहे. त्याचे चाहते या चित्रपटाबद्दल सर्वात जास्त उत्सुक आहेत. येत्या काही दिवसांमध्येच चित्रपटाचा प्रोमो सोशल मीडियावर रिलीज करण्यात येणार आहे. चित्रपटाचा नवा प्रोमो तब्बल ३ मिनिटांचा असणार आहे. याबद्दलचे वृत्त पिंकव्हिलाने दिलेले आहे. या प्रोमोमध्ये चाहत्यांना राम आणि सीतेची पहिली झलक पाहायला मिळणार आहे.
‘Sardaar Ji 3’ वादावर दिलजीतने सोडले मौन, म्हणाला ‘चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच सेन्सॉर…?’
पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, निर्माते नमित मल्होत्रा यांनी ‘रामायण’ चित्रपटाच्या प्रोमोचा ३डी व्हिडिओ सेन्सॉर करण्यासाठी सादर करण्यात आला होता. असे म्हटले जात आहे की, हा व्हिडिओ चित्रपटाचा प्रोमो आहे. म्हणजेच हा Announcement Video असणार आहे. ज्याचा कालावधी ३ मिनिटांच्या आसपास असणार आहे. रिपोर्टमध्ये असे म्हटले जात आहे की, प्रोमोला सेन्सॉर बोर्डाकडून U प्रमाणपत्र मिळाले आहे. ‘रामायण’ चित्रपटाच्या प्रोमोमध्ये चित्रपटातील कलाकारांची झलक पाहायला मिळेल. रणबीर कपूर प्रभू श्री रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
निर्मात्यांनी यापूर्वीही ‘रामाय4ण’ चित्रपटाच्या Announcement चा Promo Video प्रदर्शित करण्याची योजना आखली होती, जो मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणार होता. पण तो व्हिडिओ तेव्हा प्रदर्शित होऊ शकला नाही, आता निर्माते तो पुन्हा एकदा प्रदर्शित करण्याची योजना आखत आहेत.
केदारनाथवरून आल्यावर लावावं लागलं सलाइन, अमृता खानविलकरची बिघडली तब्येत!
प्रोमोबद्दल आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, या प्रोमोमध्ये हनुमानाच्या व्यक्तिरेखेची झलक दिसणार नाही. कारण, सनी देओल यांनी अजूनही चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात केलेली नाही. प्रोमो व्हिडिओमध्ये कदाचित निर्माते सनी देओलचा लूक टेस्टचा व्हिडिओ किंवा फोटो वापरण्याची शक्यता आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित, ‘रामायण’ चित्रपटाचा पहिला भाग २०२६च्या दिवाळीमध्ये रिलीज होणार आहे. तर, चित्रपटाचा दुसरा भाग २०२७च्या दिवाळीमध्ये रिलीज केला जाणार आहे. चित्रपटात काजल अग्रवाल, रवी दुबे, रकुल प्रीत सिंह आणि अरुण गोविल सारखे अनेक लोकप्रिय कलाकार देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.