(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळी या दोन्ही अभिनेत्रींनी नुकतीच केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रा पूर्ण केली. माळी कुटुंबियांसोबत अमृतानेही या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतले. अमृताने या यात्रेचे आणि त्या ठिकाणी केलेल्या ट्रेकिंगचे सगळे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत, मात्र द्सर्शन वैगेरे झाल्यावर अभिनेत्री घरी परतल्यानंतर तिची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे तिची तब्येत बिघडली आहे आणि तिला सलाइन लावले लागले असे असे ती म्हणाली आहे. सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर करत, केदारनाथला जाण्याची योजना आखणाऱ्यांनी काय काळजी घ्यावी याबद्दल देखील तिने माहिती दिली आहे.
अमृताने हाताला सलाइन लावल्याचे दाखवत काही व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टोरीवर चाहत्यांसह शेअर केले आहे. या व्हिडीओमध्ये अमृता म्हणते की, ‘मी काल केदारनाथवरून आले आणि आज सलाइन लावावं लागलं. गेल्या 2-3 दिवसांपासून मी प्रचंड आजारी होते, पण मी तिथे डोलो गोळी घेऊन काम चालवत होते. पण आता जे लोक केदारनाथला जाणार आहेत त्यांना मी एक सांगू इच्छिते की, केदारनाथ मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे 11,000 फूट उंचीवर आहे. ते खूप वरती आहे. त्यामुळे, या यात्रेला जाण्याआधी तुम्हाला तुमच्या शरीराची क्षमता समजून घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही तिथे जाणार असाल तर त्यानुसार शरीराला नव्या हवामानाची सवय करुन घ्या. कारण आपले शरीर ते सहन करू शकत नाही, म्हणजे माझ्या बाबतीत तरी तसे घडले नाही.’ असे अमृता म्हणाली आहे.
ती पुढे म्हणाली की, ‘माझ्यासाठी ही ट्रेक खूप कठीण होती. जेव्हा मी ट्रेकिंग करून परत खाली येत होते, तेव्हा मला त्रास झाला. शेवटचे 4 किलोमीटर म्हणजे… बापरे… असं झालं होतं. माझे पाय तुटून पडले होते. आता अंगदुखी वगैरे नाही आहे, पण माउंटेन सिकनेस अजूनही आहे. त्यामुळे केदारनाथला जाताना खूप काळजी घ्या, तुमची सगळी औषध घेऊन जा, ORS वगैरे तुमच्याबरोबर घेऊन जा.’ ‘त्याठिकाणच्या वातावरणाचा अंदाज बांधता येत नाही. आपण जिथे आहोत, तिथल्यापेक्षा ते वातावरण खूपच वेगळं आहे.’ असे अभिनेत्रीने सांगितले.
सोनाक्षी सिन्हाने दीपिकाच्या ८ तासांच्या शिफ्टच्या मागणीला दिला पाठिंबा, म्हणाली ‘हे एक वैध कारण…’
अमृताने पुढे चाहत्यांना केदारनाथ यात्रेचा सविस्तर व्हिडिओ ती तिच्या युट्यूब चॅनेलवर लवकरच शेअर करेल असे देखील ती म्हणाली आहे. ज्या गोष्टी तिच्यासाठी कठीण ठरल्या किंवा ज्यांच्या बाबतीत ते लोक नशीबवान ठरले, याविषयी माहिती ती शेअर करणार आहे. या यात्रेविषयी ती म्हणाली की, ‘सगळ्यांनी या यात्रेविषयी शेअर करायला हवं, कारण प्रत्येकाचा अनुभव वेगळा असेल आणि या गोष्टीने सर्वांना मदतच होईल. आमची यात्रा जितकी सुंदर होती, तेवढीच आव्हानात्मक होती. तिकडे गेल्यानंतर काहीच तुमच्या हातात नसतं, जे काही घडतंय त्यावर केवळ प्रतिक्रिया देता येते. ते सोपं नाहीये.’ अभिनेत्रीने या यात्रेचा संपूर्ण अनुभव शेअर केला आहे. तसेच आता चाहते तिच्या व्लॉगची आतुरतेने वाट पाहत आहेत.