
22 वर्षाच्या तरुणाची 'धुरंधर' कलाकारी! (Photo Credit - X)
कथेचा सस्पेन्स कायम ठेवणारा ‘मास्टर कट’
हिंदी चित्रपटांचे ट्रेलर अनेकदा एक मोठी चूक करतात ती म्हणजे, व्हिडिओ एडिट करताना एडिटर नकळतपणे चित्रपटाची कथा उघड करतात. ‘धुरंधर’चा ट्रेलर याला अपवाद ठरतो. ४ मिनिटांचा असूनही, प्रेक्षक या ट्रेलरमधून चित्रपटाच्या कथेचा अंदाज लावण्यात अपयशी ठरतात. हेच ओजसच्या कामाची जादू दर्शवते. या एडिटिंगमध्ये त्याला ‘किल’ (Kill) आणि ‘उरी’ (Uri) चे प्रसिद्ध एडिटर शिवकुमार पाणिकर यांनीही मोलाची साथ दिली आहे.
दिग्दर्शक आदित्य धर यांनी केले कौतुक
18 नोव्हेंबरला मुंबईत ‘धुरंधर’चा ट्रेलर लॉन्चिंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चित्रपटाच्या स्टारकास्टव्यतिरिक्त दिग्दर्शक आदित्य धर यांनी ओजसला लोकांसमोर आणले. त्याची स्तुती करताना आदित्य म्हणाले:
“तुम्ही लोकांनी या ट्रेलरचा आनंद घेतला असेल. मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा ट्रेलर आणि टीझर माझ्या 22 वर्षांच्या डीएने (DA – Director’s Assistant) कट केला आहे. त्याचे नाव ओजस गौतम आहे. जवळजवळ ७२ ते ७६ तास झाले आहेत आणि हा मुलगा झोपलेला नाही. हा सकाळी ४ वाजेपर्यंत हा ट्रेलर कट करत होता.”
आदित्यने व्यक्त केला विश्वास
“तो २२ वर्षांचा आहे आणि माझ्या खूप जवळ आहे. तो माझ्यासोबत जवळपास २०२१ पासून आहे. जेव्हा मी ‘अश्वत्थामा’ (Ashwatthama) बनवण्यासाठी संघर्ष करत होतो, तेव्हाही तो माझ्यासोबत होता. एक खूप मोठं कारण की मी हा चित्रपट (‘धुरंधर’) बनवू शकलो, ते या मुलाच्या जिद्दीमुळे आहे. त्याने कधीही माझ्यावरचा विश्वास सोडला नाही. मला खात्री आहे की तो पुढील १० वर्षांत देशातील सर्वात मोठा डायरेक्टर बनेल.”
यामी गौतमचा धाकटा भाऊ
विशेष म्हणजे, आदित्य आणि ओजसचं नातं केवळ व्यावसायिक नाही, तर कौटुंबिक देखील आहे. तो आदित्यची पत्नी आणि प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री यामी गौतमचा धाकटा भाऊ आहे. त्याने यापूर्वी २०२५ मध्ये आलेल्या यामी आणि प्रतीक गांधी स्टारर ‘धूम-धाम’ (Dhoom-Dhaam) मध्ये इंटर्न म्हणून काम केले होते. ‘धुरंधर’ हा चित्रपट एडिटर म्हणून ओजसचा पहिला चित्रपट आहे. तसेच, सर्व प्रॉड्यूसर्सला या चित्रपटाचं कथाकथन (Narration) करणारी व्यक्ती देखील तोच आहे.