
फोटो सौजन्य - Social Media
आज ४ ऑगस्ट २०२४, भारतातले लेजेंडरी गायक तसेच भारतीय संगीताचा कधीही न मावळणारा सूर्य म्हणजेच किशोर कुमार यांचा ९५ वा वाढदिवस आहे. भारतीय संगीतासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावणारे हाडाचा कलाकार म्हणून त्यांची संपूर्ण जगभर ख्याती आहे. 60’s च्या दशकापासून, तरुणांच्या मनावर राज्य करणारे किशोर दांचे राज्य आजही कायम आहे. त्यांचा आवाज अजरामर आहे. आजचे तरुणही त्यांच्या गाण्यांसाठी तितकेच वेडे आहेत जेवढे 60’s आणि 70’s च्या दशकातील तरुण होते. ‘ओ मेरे दिल के चैन’, ‘भीगी भीगी रातों में’, “नीले नीले अंबर पर’ या गाण्यांनी तर इतका कहर केला आहे कि या गाण्यांसाठी असणारे तरुणाईचे वेड जवळजवळ अर्धशतक होऊन गेले तरी काही कमी झाले नाही आहे.
किशोर कुमार यांचा जन्म ४ ऑगस्ट १९२९ रोजी झाला होता. त्यांचे बंधू अशोक कुमार सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. किशोरदांबद्दलचे अनेक किस्से सिनेसृष्टीत प्रसिद्ध आहेत, ज्या त्यांच्या मजेशीर आठवणींचा भाग आहे. किशोर कुमार यांची रेकॉर्डिंग करण्यापूर्वी पैसे घेण्याची सवय अजून संगीतसृष्टीत चर्चेचा विषय ठरते. किशोरदांना जेव्हा विचारण्यात आले कि तुम्ही रेकॉर्डिंगपूर्वीच पैशांची मागणी का करता? म्हणजे इतकी घाई कशाला आहे? तेव्हा किशोर दांनी त्यांचा अनोखा किस्सा सांगितलं होता. ते म्हणायचे कि त्यांचे बंगाली नातेवाईक पहिले गाणे गाऊन द्यायचे नंतर हातात मिठाईचा बॉक्स देऊन निघून जायचे. तेव्हापासून त्यांनी आधीच पैसे घेण्याची रीत सुरु केली.
हे सुद्धा वाचा : Bigg Boss Marathi : रितेश देशमुखने निक्कीला फटकारलं! म्हणाला “माझ्या मराठी माणसाची माफी….”
अनोखी बात म्हणजे, रेकॉर्डिंग करण्यापूर्वी किशोरदांचा सेक्रेटरी त्यांना इशारा द्यायचा कि पैसे मिळाले रे! पण जर तो इशारा आला नाही तर किशोरदा घसा खराब असल्याचे कारण सांगून घरी निघून जायचे. एकदा तर रेकॉर्डिंग आधी आर्धी पेमेंट मिळाल्याने किशोरदा अर्धी मिशी कापून आले होते. संगीतकाराने विचारले असता ते म्हणाले कि इतक्या पैशामध्ये इतकाच गेट अप मिळेल. किशोर दादा त्यांच्या अशा अनोख्या आणि मजेशीर वागण्यामुळे संगीतसृष्टीत प्रसिद्ध होते.