
मुंबई: अवघ्या महाराष्ट्राचे भाऊ आणि वहिनी म्हणजे आपले आवडते रितेश देशमुख (Reteish Deshmukh) आणि जिनिलिया डिसुझा (Genelia D souza) बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये या दोघांना सर्वात सुंदर आणि परफेक्ट कपल मानलं जातं. आपल्या अभिनयाने वेड लावणाऱ्या या जोडप्याचं वैशिष्ट म्हणजे सार्वजनिक ठिकाणी अत्यंत नम्रपणे वागतात. त्यांचेच संस्कार त्यांच्या मुलांमध्ये दिसत असुन नुकताच या कपलच्या गोंडस मुलांचा एक व्हिडिओ समोर आला आहे त्यामुळे सोशल मिडियावर सगळे त्यांच कौतुक करत आहेत.
[read_also content=”मुंबईत एकाच दिवशी एकाच व्यक्तीकडुून तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; नूडल्सचं आमिष दाखवून शेजाऱ्यानचं केलं कृत्य, आरोपी अटकेत https://www.navarashtra.com/crime/three-minor-girls-were-molested-by-the-same-person-on-the-same-day-in-mumbaib-nrps-372956.html”]
रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा यांना नुकतंच मुंबई विमानतळावर स्पॅाट झालेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची दोन्ही मुलं होती. पापाराझींना पाहताच या रियान आणि राहिल या दोघांनी नम्रपुर्वक हात जोडून नमस्कार केला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये दिसतय की रितेश जिनिलियांच्या मुलांनी पापाराझींना समोर पाहताच हात जोडले तसेच रितेश आणि जिनिलियानेही त्यांना हात जोडुन धन्यवाद केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांच्या हृदयाला स्पर्शुन गेला असुन चाहत्यांनी रियान आणि राहिलच्या स्टाइलचे कौतुक केले आहे.
एका युजरने या व्हिडिओवर कमेंट केली की, ‘हे बघा, हा एक मुलगा आहे ज्याची वागणूक इतकी चांगली आहे की तो फोटोग्राफरला सलाम करतो आणि एक सैफचा तैमूर आहे जो शिवीगाळ करतो आणि म्हणतो की मी मारनार आणि एक शाहरुखचा ड्रगिस्ट मुलगा आहे जो दुसऱ्यांना काही समजतच नाही. तर, एका .युझरने म्हण्टलं की, ‘मुलं खूप गोंडस आहेत. किती चांगले संस्कार आहेत या मुलांचे. जेव्हा जेव्हा मीडियाला पाहतात तेव्हा तेव्हा हात जोडतात. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. एकाने म्हण्टलंय, ‘छान, संस्कार आहेत, लहानपणापासून दिसत आहेत.’