ritiesh deshmukh ( फोटो सौजन्य - social media)
अभिनेता रितेश देशमुखच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. यामुळे रितेश देशमुखला मोठा धक्का बसला आहे. निधन झालेल्या व्यक्तीचे नाव राजकुमार तिवारी असे असून ते रितेशची मॅनेजर होते. रितेशने जेव्हापासून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, तेव्हापासून राजकुमार तिवारी हे रितेशचे मॅनेजर होते. राजकुमार तिवारी हे रितेशसाठी केवळ एक मॅनेजर नव्हते. तर ते उत्तम मार्गदर्शक आणि एका मोठ्या भावाप्रमाणे कायम त्याच्यासोबत होते. रितेशने राजकुमार यांच्यासोबत एक फोटो इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे.
रितेश देशमुखच्या सर्वात पहिला चित्रपट २००३ मध्ये आला होता. तुझे ‘तुझे मेरी कसम’ असे या चित्रपटाचे नाव आहे. त्यानंतर अनेक त्याने हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रितेश देशमुखने काम केलेल्या काही चित्रपटाचे नाव हाऊसफुल’, ‘मस्ती’, ‘क्या कूल है हम’, ‘धमाल’, ‘रेड 2’ आणि मराठी ‘ बिग बॉस’ मराठीचा सूत्रसंचालन देखील त्यांनी केला होत. या संपूर्ण प्रवासात राजकुमार यांनी त्याची खूप मदत केली होती. प्रत्येक पावलावर त्यांनी रितेशचं मार्गदर्शन केलं होतं. त्यामुळे रितेश देशमुख राजकुमार तिवारीच्या निधनाने खचला आहे. त्याने सोशल मीडियावर याबाबतीची माहिती देत आपल्या भावना व्यक्त केला आहे.
रितेशने केलेल्या पोस्टमध्ये काय?
रितेशने सोशल मीडिया पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने पोस्टमध्ये ‘राजकुमार तिवारीजी आमच्यात नाहीत हे जाणून मला अत्यंत दु:ख झालं आहे, मोठा धक्का बसला आहे. ते माझे मार्गदर्शक, माझे मोठे भाऊ, माझं कुटुंब होते. मी पदार्पण केल्यापासून त्यांनी माझ्या कामाचं व्यवस्थापन केलंय. कठीण काळात ते माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. मला तुमची कायम आठवण येईल तिवारीजी. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो,’ असं त्याने लिहिलं आहे.
इतर मोठ्या कलाकारांसोबत केलं होत काम
रितेशचे मॅनेजर राजकुमार तिवारी यांनी रितेशच्या आधी इतर मोठ्या कलाकारांसोबत काम केलं होत. काही वर्षांपूर्वी खुद्द रितेशने त्यांचा एक फोटो पोस्ट केला होता. यामध्ये ते विनोद खन्ना आणि फिरोज खान यांच्यासोबत दिसले होते. ‘माझे मॅनेजर, माझे आधारस्तंभ.. राजकुमार तिवारी हे इंडस्ट्रीतल्या दोन रॉकस्टार्ससोबत.. विनोद खन्नाजी आणि फिरोज खान साहेब’, असं त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं.
क्या अदा क्या जलवे तेरे…ट्रान्सपरंट साडी, बॅकलेस ब्लाऊज; सई अगं वेडंच व्हायचं बाकी आहे!